उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या दंतेवाडा-विजापूर सीमावर्ती भागात पोलिस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली.यात दोन नक्षल्यांना कंठस्नान देण्यात आली असून सुरक्षा दलाचे ४०० जवानांनी दंतेवाडा-विजापूर सीमेवरील भैरमगड परिसरात संयुक्त कारवाई करण्यात आली असल्याचे दंतेवाडा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी म्हटले आहे.अशातच खात्मा करण्यात आलेल्या एका नक्षलीचा आयईडी स्फोटात सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे.छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील आंबेली येथे ६ जानेवारी २०२५ रोजी नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला होता, त्यावेळेस ८ जवानासह एक चालक शहीद झाला होता. विजापूरच्या इंद्रावती भागातील जंगल परिसरात नक्षलवादी लपून बसले असल्याची गुपित माहिती प्राप्त होताच ४०० जवान कारवाईसाठी पाठविण्यात आले होते.शोध मोहिमेत दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून कारवाईत नक्षलवाद्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पोलिस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक; दोन नक्षल्यांना कंठस्नान..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

