Monday, June 29, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; ५ नक्षलवादी ठार..

पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; ५ नक्षलवादी ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नक्षल विरोधी अभियानामुळे नक्षलवाद्यांचे धाबे दणाणले आहेत.सुरक्षा दल नक्षलवाद्यांना सळो की,पळो करून सोडत आहेत. अशातच छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली असून दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात ५ नक्षलवादी ठार झाले.तेलंगणा,महाराष्ट्र आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील हजारो सैनिक या ऑपरेशनमध्ये आहेत.छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्याच्या कॅरेगट्टा जंगल भागात मोठी नक्षलविरोधी कारवाई सुरु आहे.
देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी कारवाई मानली जात आहे.कारण यात छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील हजारो सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.त्यानी बिजापूर जिल्ह्यातील कॅरेगट्टा जंगल भागात नक्षलवाद्यांना घेरले असल्याची माहिती आहे.ही कारवाई सुमारे ४८ तास सुरू आहे.मोस्ट वॉन्टेड कमांडर हिडमा आणि बटालियन प्रमुख देवा यांच्यासह प्रमुख नक्षलवादी नेत्यांच्या हालचालीबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली.जिल्हा राखीव रक्षक दल (DRG),बस्तर फायटर्स,विशेषटास्क फोर्स (STF),राज्य पोलिसांच्या सर्व तुकड्या,केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) आणि त्यांच्या कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट ॲक्शन (COBRA) यांच्यासह विविध तुकड्यांतील सुरक्षा कर्मचारी या कारवाईत सहभागी
झाले आहेत.नक्षलवाद्यांच्या पलायनाचे सर्व मार्ग बंद करण्यासाठी सुरक्षा दलांनी संवेदनशील छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेंगट्टा भागाला घेरले आहे. घनदाट जंगल आणि टेकड्यांनी वेढलेला हा परिसर माओवाद्यांच्या बटालियन क्रमांक १ चा अड्डा मानला जातो.काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले होते. त्यातून त्यांनी ग्रामस्थांना डोंगरात प्रवेश न करण्याचा इशारा दिला होता.या भागात मोठ्या प्रमाणात आयईडी पेरण्यात आले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.
सैनिकांनी हिडमा,दामोदर,देवा आणि त्यांच्या बटालियनसह अनेक मोठ्या नेत्यांना करेगट्टा, नाडपल्ली,पुजारी कांकेर या टेकडीवर वेढले आहे.येथे ३०० हून अधिक नक्षलवादी असल्याची माहिती आहे. हे ऑपरेशन ३ दिवसांहून अधिक काळ चालू आहे. दल आत आहे.सैनिकांसाठी रसद हेलिकॉप्टरद्वारे पोहोचवली जात आहे.हे ऑपरेशन सुमारे एक आठवडा चालेल असा अंदाज आहे.या संपूर्ण परिसरात दलाचे सुमारे २ ते ३ हेलिकॉप्टर फिरत आहेत.या परिसरावर डझनभर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे.काही डोंगररांगा आहेत ज्या ४० ते ५० मीटर उंच आहेत.नक्षलवाद्यांनी लपण्यासाठी येथे डझनभर बंकर बांधले आहेत.आता पर्यंतची सर्वात मोठी नक्षलविरोधी मोहीम असल्याचे सांगितले जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आज,सोमवार २९ जून ते १३ जुलै २०२६ या...

देसाईगंज रेल्वे बोगदा मार्गावरील वाहतूक आणखी ११ दिवस राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-देसाईगंज(वडसा)रेल्वे स्थानकाजवळील एलएचएस-५९(रेल्वे बोगदा अंडरपास)येथील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतुकीवरील निर्बंधांची मुदत १० जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली...

३१ वर्षीय तरुण वाघाच्या हल्ल्यात ठार..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-३१ वर्षीय तरुण वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा लगतच्या चोरगाव परिसरात उघडकीस आली.कुंपणासाठी शेताच्या बाजूच्या झाडांच्या फांद्या तोडत...

नैनपूरच्या महात्मा गांधी नगरपरिषद शाळेत श्रमदानातून स्वच्छतेचा प्रेरणादायी संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "माझा गाव...माझी शाळा...माझी जबाबदारी" या संकल्पनेतून देसाईगंज शहराच्या नैनपूर येथील महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळेत आज,सोमवार २९ जून रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!