- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-हिंसेचा मार्ग सोडून अहिंसेचा मार्ग पत्करून,दगदगीचे जीवन जगण्यापेक्षा पुढील आयुष्य
आनंदमयी जगण्यासाठी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील ९ नक्षलवाद्यांनी आज,गुरुवारी ३० जानेवारीला पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले असून आत्मसमर्पित नऊ नक्षलिंवर ५२ लाख रुपयांचे बक्षीस होते.नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षली कमिटीला मोठा हादरा बसला आहे.आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांपैकी ६ महिला नक्षलवाद्यांवर प्रत्येकी ८ लाख रुपये,दोन महिला नक्षलवाद्यांवर प्रत्येकी १ लाख रुपये आणि एका नक्षलवाद्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.हिडमा आणि देवाच्या टीममधील कट्टर नक्षलवादी दाम्पत्यानेही त्यामध्ये आत्मसमर्पण केले आहे.मागील काही कालावधीपासून छत्तीसगडमध्ये जवानांकडून मोठ्या प्रमाणावर नक्षली कारवाया करण्यात येत आहेत.करण्यात येत असलेल्या कारवायात अनेक नक्षली ठार होऊन नक्षल्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.त्यामुळे नक्षली जीवन सोडून सर्वसामान्य जीवन जगण्याच्या वाटेवर अनेक नक्षली मुख्य प्रवाहात येऊ लागले आहेत.
- Advertisement -

