उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- कमी वेळात जास्त पैसे कमविण्याचे आमिष दाखवून एका दलालाने दोन तरुणींना जाळ्यात ओढले. दोघींनाही सेक्स रॅकेट’मध्ये ढकलले.याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली असता, त्यांनी छापा टाकून दोन मुलींची सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून त्याची रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे.
आरोपीने दोन तरुणींना कमी वेळात जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवले.त्यानंतर त्यांना देहविक्रीच्या व्यापारात ढकलले.याची माहिती पोलिसांना खबऱ्या मार्फत मिळाली.माहिती मिळताच,पोलीसांनी नरेंद्रनगरातील नवनाथ सोसायटीतील श्रध्दा इन हॉटेल मध्य अचानक छापा टाकला.पोलिसांनी सुरूवातीला बनावट ग्राहकाद्वारे आरोपीसोबत संपर्क साधला.आरोपीने तरुणीचा एका रात्रीत १२ हजार रुपये असा सौदा केला.दरम्यान, बनावट ग्राहकाने हॉटेवर जाताच, पोलिसांनी छापा टाकला.यावेळी पोलिसांकडून दोन तरुणींची सुटका करण्यात आली.आरोपी हा पैशाचे आमिष दाखवून दोन मुलींकडून देहव्यापार करवून घेत असल्याचे उघडकीस आले.याप्रकरणी आरोपीविरूध्द बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.