Thursday, September 24, 2026
Homeगडचिरोलीपुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही वर्षांपासून निसर्गाचे चित्र पूर्णपणे बदलून गेले आहे.कधी भर उन्हाळ्यातच पावसाळ्यासारखे वाटते,तर कधी भर पावसाळ्यातच घामाघूम झाल्यासारखे वाटत असते.अश्यातच पावसाळ्यातील शेवटच्या सप्टेंबर महिन्यातील पाऊस हा परतीचा पाऊस आहे की काय?असे म्हणताच येणार नाही.नुकतेच हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार,२३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबरदरम्यान काही ठिकाणी हलका ते मध्यम,तर काही भागांत मध्यम ते मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली असतांनाच आता काही वेळापूर्वीच मुंबईच्या मंत्रालय स्तरावरून नागरिकांना मोबाईलवर एक संदेश पाठविण्यात आला असून पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसण्याचा इशारा जारी करण्यात आला आहे.संदेशात पुढील ३ तासात गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी जोरदार पावसासह ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची आणि वादळ होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा मार्ग मोकळा; खात्यात येणार दीड हजार..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या प्रलंबित हप्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.विशेष म्हणजे,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!