उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- पी.एम.किसान योजनेच्या १३ व्या हप्त्याचे वितरण २७ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे.योजनेचा लाभ केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधारशी जोडणे अनिवार्य आहे; अन्यथा पी.एम.किसान सन्मान निधीचा लाभ मिळणार नाही.
आधार सिडींग प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाते भारतीय डाक विभागामार्फत उघडण्यात येत आहेत.प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाती नव्याने उघडल्यावर पुढील ४८ तासांत आधार संलग्न होऊन सक्रिय होतील.सर्व प्रलंबित पी.एम.किसान शेतकरी लाभार्थ्यांनी आपली बँक खाती पोस्टात उघडण्यात यावी.यामुळे दोन दिवसांत आधार लिंक करून मिळणार आहे. कोणताही शेतकरी लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत.जेनेकरून पीएम किसान योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांना मिळू शकेल.