उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- राजू दिलीप छत्रपाल वय ३४ वर्षे नागपूरच्या दहिबाजार पुला जवळ वास्तव्यास राहत असून धंतोलीच्या एका लॅब मध्ये काम करतात.काल १७ जून रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास पश्चिम बंगालला जाण्यासाठी रेल्वे गाडीचे आरक्षण करण्यासाठी आपल्या पावणे तीन वर्षाच्या मुलीला नागपूरच्या इतवारी रेल्वे स्थानकावर घेऊन गेले असता गर्दीमुळे त्यांनी आपल्या चिमुकलीला कडेवरून खाली उतरविले व आवश्यक असणाऱ्या कामात मग्न झाले असता; श्यामकुमार पूनितराम ध्रुव वय ३० वर्षे छत्तीसगढ,बिलासपूर येथील मुंगेरी गावातील रहिवासी असलेल्या आरोपीने संधी साधून वडिलांच्या कडेवरुन खाली उतरलेल्या चिमुकलीला घेऊन पळ काढला.मुलगी दिसत नसल्याने वडील राजू यांनी आरडाओरड केली व रेल्वे पोलिसांना याबाबत सर्व हकीकत सांगितली.लगेच रेल्वे पोलीस व शहर पोलिसांनी शोध मोहीम राबविली.शोध मोहिमेत परिसरातील व शहरातील संपूर्ण सीसीटिव्ही कॅमेरे पिंजून काढण्यात आले असता एका ऑटोरिक्षामध्ये आरोपी श्यामकुमार चिमुकलीला घेऊन जातांना आढळला; सदर रिक्षाचालक याच्याशी पोलीसांनी संपर्क साधला असता नागपूरच्या मुख्य रेल्वे परिसरात आरोपी असल्याचे दिसून येताच पोलीसांनी दोन तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्याने सर्वांनी सुटकेचा नी:श्वास सोडला.