- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी,पोलीस अधिकारी यांना दहावी,बारावी परीक्षेत होणाऱ्या कॉपीबाबत नवीन आदेश दिले.दहावी,बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी.तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली.या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी,पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारी बाबत आणि कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी,परीक्षा केंद्रावर आणि १०० मीटर परिसरात अनाधिकृत व्यक्तींना पूर्णतः प्रतिबंध करण्यात यावा,परीक्षा केंद्रात प्रवेश देतांना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य जवळ बाळगणार नाहीत,याची खबरदारी घ्यावी व इतर निर्देश दिले.
- Advertisement -

