Friday, April 17, 2026
Homeगडचिरोलीपोलीस-नक्षल चकमक; गडचिरोली जिल्ह्यातील जवान शहीद..

पोलीस-नक्षल चकमक; गडचिरोली जिल्ह्यातील जवान शहीद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील
दिरंगी आणि फुलणार गावातील जंगल परिसरात नक्षल्यांनी छावणी उभारल्याची माहिती मिळताच अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम.रमेश आणि श्रेणिक लोढा यांच्या नेतृत्वात सी-६० पथकाच्या १८ आणि जलद प्रतिसाद पथकाच्या(सीआरपीएफच्या क्यूएटी) २ तुकड्या त्या भागात काल,सोमवार १० फेब्रुवारीला रवाना करण्यात आल्या होत्या.तुकडीतील जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबविण्यास सुरुवात केल्यानंतर आज,मंगळवार ११ फेब्रुवारीला नक्षल्यांनी जवानांवर गोळीबार केला.त्यानुसार आज दिवसभर चकमक सुरू होती.अशातच नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलीस अंमलदार महेश कवडू नागुलवार वय ३९ वर्षे,रा.अनकोडा,ता.चामोर्शी,जि. गडचिरोली हे जखमी झाले होते.त्यामुळे त्यांना तातडीने सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचारकरीता दाखल करण्यात आले.अशातच उपचारादरम्यान महेश नागुलवार हे शहीद झाले.त्यांची नेमणूक गडचिरोलीच्या विशेष अभियान पथकात होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! कासवांची तस्करी करणाऱ्यांकडून धक्कादायक बाबी उघड.. – अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ आणि चॅटिंग..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपक्षेत्राच्या नियतक्षेत्र शिर्शी बिटातील चिचडोह बॅरेजवरून हरंबा गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर कासवाची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची...

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!