Wednesday, June 10, 2026
Homeगडचिरोलीपरवाना केवळ विक्रीचा; मात्र दुकानदारांकडे जाऊन करायचे पडताळणीची वसुली .. - जनबंधू...

परवाना केवळ विक्रीचा; मात्र दुकानदारांकडे जाऊन करायचे पडताळणीची वसुली .. – जनबंधू स्केल सर्व्हिसेसचा विक्री परवाना निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-इलेक्ट्रॉनिक वजन काटे विक्री व सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या जनबंधू स्केल सर्व्हिसेस, चामोर्शी या संस्थेवर वैध मापन शास्त्र विभागाने कठोर कारवाई करत त्यांचा विक्री परवाना निलंबित केला आहे. संबंधित संस्थेकडून अधिकार नसतांना लहान दुकानदारांकडे जाऊन वजन काट्यांची पडताळणी व मुद्रांकन करून देण्याच्या नावाखाली रक्कम घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर सदरची कारवाई करण्यात आली आहे.
वैध मापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक जितेंद्र मोरे यांच्या आदेशानुसार जनबंधू स्केल सर्व्हिसेस,चामोर्शी प्रोप्रायटर अमोल नोमेश्वर जनबंधू यांचा विक्री परवाना क्रमांक LM/GDL/LD/018 दिनांक-२९ एप्रिल २०२६ पासून निलंबित करण्यात आला आहे. तपासादरम्यान संबंधित परवानाधारकाने वैध मापन शास्त्र अधिनियम व परवान्याच्या अटींचा भंग केल्याचे आढळून आले.
वैध मापन शास्त्र विभागाच्या माहितीनुसार,संबंधित संस्थेला केवळ इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांच्या विक्रीचा परवाना देण्यात आला होता.मात्र,त्यांनी अधिकृत अधिकार नसतांना विविध किरकोळ दुकानदारांकडे जाऊन वजन काट्यांची पडताळणी,मुद्रांकन व प्रमाणिकरण करून देण्याचे सांगत त्याबदल्यात रक्कम स्वीकारल्याचे समोर आले.वजन काट्यांचे अधिकृत पडताळणी व मुद्रांकन करण्याचा अधिकार केवळ वैध मापन शास्त्र विभागाकडे असतांना अशा प्रकारे नागरिकांची व व्यापाऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.या पार्श्वभूमीवर वैध मापन शास्त्र विभागाचे निरीक्षक आर.एन.फुलझेले यांनी नागरिक, व्यापारी व ग्राहकांनी वजन माप पडताळणी अथवा मुद्रांकन प्रक्रिया अधिकृत शासकीय यंत्रणेमार्फतच करून घ्यावी,असेही आवाहन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!