उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली(कोरची) :- कोरची तालुक्यातील कोचीनारा गावा नजीकच्या जंगल परिसरात आरोपीची पत्नी व मुलगी सरपण गोळा करण्यासाठी गेले असता प्रीतराम धकाते याने पत्नी व मुलीवर कुऱ्हाडीने वार करून पत्नीला ठार केले.यात मुलगी जखमी झाली होती.सदर घटने नंतर प्रीतराम फरार होऊन साधूच्या वेशात उत्तर प्रदेशातील मथुरा येथील एका मंदिरात असल्याची गोपनीय माहिती कोरची पोलिसांना मिळाली.त्यानुसार कोरची पोलीसांनी पथक तयार करून मथुरा रवाना झाले.आरोपीला सुगावा लागू नये; याकरिता एपीआय यांनी साधूची वेशभूषा धारण केली तर अन्य कर्मचारी रिक्षाचालक व चना विक्रेते बनून सापडा रचून अटक केली.तब्बल १६ दिवसानंतर आरोपीस अटक करण्यास कोरची पोलिसांना यश मिळाले.आरोपी पतीचे नाव प्रीतराम धकाते असून रा.कोचिनारा ता.कोरची येथील रहिवासी आहे.