Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजनैनपूरच्या विद्यार्थ्यांचा ‘सीमेवरील जवानांसाठी प्रेमाची राखी’ उपक्रम; जवानांना पाठवल्या राख्या..

नैनपूरच्या विद्यार्थ्यांचा ‘सीमेवरील जवानांसाठी प्रेमाची राखी’ उपक्रम; जवानांना पाठवल्या राख्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड येथे आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा,सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविणारा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.शाळेतील महात्मा गांधी स्काऊट-गाईड पथक तसेच कब-बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या तयार केल्या.या राख्या सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय वीर जवानांपर्यंत पोहोचाव्यात,या भावनेतून ‘सीमेवरील जवानांसाठी प्रेमाची राखी’ हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सर्व राख्या ‘५६ एपीओ’ मार्फत भारतीय जवानांसाठी पाठविण्यात आल्या.
सीमेवर कुटुंबापासून दूर राहून देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा विद्यार्थ्यांचा हा छोटासा प्रयत्न अत्यंत भावनिक आणि देशभक्तीपूर्ण ठरला. “राखीचा धागा सीमेपर्यंत,नैनपूरच्या विद्यार्थ्यांचे प्रेम जवानांच्या मनापर्यंत” हा या उपक्रमाचा भावनिक संदेश ठरला.अश्यातच आज नैनपूर येथील प्रतिष्ठित नागरिक लुणकरण चौधरी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेला सहा खुर्च्या भेट स्वरूपात दिल्या.स्वतःच्या वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपयोगासाठी समर्पित करण्याचा चौधरी यांचा हा उपक्रम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आहे.शाळेच्या वतीने लुणकरण चौधरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल मुख्याध्यापक व शाळा परिवाराने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.या उपक्रमातून एकीकडे विद्यार्थ्यांनी देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली, तर दुसरीकडे समाजातील नागरिकांनी शाळा व विद्यार्थ्यांसाठी सामाजिक योगदान देण्याचा आदर्श निर्माण केला.
या उपक्रमाचे नियोजन व आयोजन शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.उपक्रम यशस्वीतेसाठी  ईश्वर गहाणे यांचेसह शिक्षक मंगेश तुपट,शिक्षिका अपर्णा जडे,तृषाली सुखदेवे,भारती राऊत,प्रियंका तलमले आणि प्राची खरकाटे यांनी मोलाचे सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!