Saturday, May 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनुसत्या मोफतच्या रेवड्या वाटाल तर काम कोण करेल- सर्वोच्च न्यायालय

नुसत्या मोफतच्या रेवड्या वाटाल तर काम कोण करेल- सर्वोच्च न्यायालय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या विविध राज्यात फुकट्या योजना म्हणजेच बऱ्याच योजनांच्या माध्यमातून वीज, प्रवास,अन्न व इतर बरेच काही मोफत दिल्या जात आहे. यामुळे अनेकजण सुखांगे होऊन ऐतखाऊ बनले आहेत. अश्याच प्रकारे तामिळनाडू पॉवर डिस्ट्रीब्यूशन कॉर्पोरेशनच्या याचिकेवर आज,गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करतांना देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत,न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम पंचोली यांच्या खंडपीठाने म्हटले की,देशातील बहुतेक राज्ये महसुली तुटीत आहेत.ती विकासाकडे तसेच रोजगार निर्मितीकडे दुर्लक्ष करून मोफतच्या रेवड्या देत आहेत.नुसत्या मोफतच्या रेवड्या वाटाल तर काम कोण करेल? अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली.
विशेष म्हणजे,तामिळनाडू पॉवर डिस्ट्रीब्यूशन कॉर्पोरेशनच्या कंपनीने २०२४ च्या विद्युत सुधारणा नियमांमधील नियम २३ ला आव्हान दिले आहे.यात ग्राहकांच्या आर्थिक स्थितीची पर्वा न करता सर्वांना मोफत वीज देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केला आहे.तामिळनाडू राज्य सरकार घरगुती ग्राहकांना प्रत्येक दोन महिन्यांत सुमारे शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देते,कोणत्याही अटीशिवाय म्हणजे ग्राहक कितीही वापर करो,पहिल्या शंभर युनिटसाठी बिल भरावे लागत नाही.यावर न्यायालयाने म्हटले की, गरिबांना मदत करणे ठीक आहे; पण सर्वांनाच मोफत सुविधा देणे योग्य नाही.कल्याणकारी योजनेअंतर्गत तुम्ही त्या लोकांना दिलासा द्या जे विजेचे बिल भरू शकत नाहीत.पण जे लोक पैसे भरण्यास सक्षम आहेत आणि जे नाहीत, त्यांच्यात कोणताही फरक न करता मोफत सुविधा देणे हे तुष्टीकरणाचे धोरण नाही का?” प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात केंद्र सरकार आणि इतर पक्षांना नोटीस बजावली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!