Monday, April 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनिवडणुकांपूर्वी जाहीर केलेल्या फुकटच्या योजना म्हणजे एक प्रकारे 'लाच'... - सुप्रीम कोर्टाने...

निवडणुकांपूर्वी जाहीर केलेल्या फुकटच्या योजना म्हणजे एक प्रकारे ‘लाच’… – सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला पाठवली नोटीस…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजनांचा धडका सुरू केला तो संपता-संपेना..! अशी अवस्था झाली होती.अनेक योजनांच्या माध्यमातून सरकारने जणूकाही पैश्यांची बरसातच केली असल्याने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाहीर केलेल्या आणि राबविण्यात येणाऱ्या मोफतच्या योजना म्हणजे ‘लाच’ देण्याचा प्रकार आहे.त्यामुळे अशा योजना थांबविण्यात याव्यात तसेच सरकार आणि राजकीय पक्षांना याबाबत योग्य ते दिशानिर्देश द्यावेत; अशी मागणी करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.या याचिकेवरील सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठने केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला याबाबत नोटीस पाठवली आहे.निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेला दिलेली आश्वासने म्हणजे एक प्रकारे लाचेचा प्रकार आहे; असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आज मंगळवारी जाहीर होत आहेत.या निवडणुकीच्या दोन ते तीन महिने अगोदर सरकराने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली होती.या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये वर्ग होणार आहेत.यासह अनेक योजना सरकारने जाहीर केल्या आहेत.
या याचिकेवर आज मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली.सरकारने निवडणुकांपूर्वी जाहीर केलेल्या फुकटच्या योजना म्हणजे एक प्रकारे लाच असून अशा घोषणा लाच म्हणून जाहीर कराव्यात;  अशी याचिका आहे.निवडणुकीपूर्वी अशा घोषणांवर बंदी घातली जावी आणि राजकीय पक्ष आणि सरकारवर निर्बंध लादावेत; अशी मागणी याचिकेतून करण्यात आलेली आहे.
सदरील याचिका शशांक जे श्रीधर यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली.त्यांच्या वतीने वकील बालाजी श्रीनिवासन यांनी कोर्टात बाजू मांडली.सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी निवडणूक आयोगासह केंद्राला नोटीस पाठवून उत्तर मागवले आहे.अशा प्रकारच्या आणखी दोन ते तीन याचिका कोर्टामध्ये दाखल आहेत.लोकप्रतिनिधी कायदा १९५१ अंतर्गत मोफत योजना म्हणजे लाचखोरी किंवा मतं मिळण्याच्या अपेक्षेने दिलेले प्रलोभन मानले पाहिजे; असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
(सौजन्य-सकाळ)
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

आता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अजूनही विशेषतः ग्रामीण आणि काही दुर्गम भागात छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जातात.अनेकदा मुलगी अल्पवयीन असतांनाही तिचे लग्न लावून...

उन्हाचा तडाखा; फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण व ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढलेल्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण(फिटनेस सर्टिफिकेट रेनेवल)तसेच पक्की अनुज्ञप्ती(ड्रायव्हिंग लायसन्स)चाचणीच्या...

३० वर्षीय महिलेची दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज,सोमवार २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक भयावह आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली.नात्यातील दिरासोबत विवाह समारंभासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!