Wednesday, October 7, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनिधीअभावी घरकुलधारकांच्या स्वप्नाला तडे..!

निधीअभावी घरकुलधारकांच्या स्वप्नाला तडे..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-घरकुल मंजूर झालेल्या अनेक लाभार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून अद्याप निधी न मिळाल्याने अनेकांचे घरकुल बांधकाम रखडले आहेत. घरकुल मंजूर होऊनही निधी वितरित न झाल्यामुळे अनेक गरजू कुटुंब आजही कच्च्या,मोडकळीस आलेल्या घरात वास्तव्यास असल्याचे चित्र आहे.या लाभार्थ्यांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.काहींना घरकुलासाठी आवश्यक असलेला पहिला हप्ता न मिळाल्यामुळे बांधकाम सुरू करता येत नसल्याची तक्रार लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे,तर काहींना पहिला हप्ता मिळाला असून दुसरा हप्ता न मिळाल्यामुळे बांधकाम रखडले आहे.विशेष म्हणजे,काही लाभार्थ्यांनी कर्ज काढून पाया खोदकाम केले असतांना निधीअभावी काम अर्धवट अवस्थेत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे अनेकांच्या स्वप्नाला तडे जात आहेत.बरीचशी घरकुल बांधकामे अर्धवट अवस्थेत असल्याने राहायचे कुठे? असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून सोडत आहे.सरकार गरिबांसाठी घरकुल योजना राबवत असतांना प्रत्यक्षात मात्र लाभार्थ्यांना निधीअभावी वंचित राहावे लागत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी...

पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरीच संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.निलेश भाऊसाहेब पाटील वय ५५ वर्षे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव...

आता तालुकास्तरावरच मिळणार तात्पुरते फटाका सेंटरचे परवाने..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आता व्यावसायिकांना जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही.अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!