- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :-भावनिकरित्या अस्वस्थ झालेल्या एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली तर त्यासाठी इतर कुणाला दोषी मानता येणार नाही.नाते तोडली किंवा लग्नाचे आमिष दाखवून दिलेले वचन मोडले तर अशी व्यक्ती आत्महत्येसाठी प्रवृत्त करीत आहे; असे म्हणणे चुकीचे असल्याचे आज,शुक्रवारी २९ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात म्हटले आहे.
दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने,कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला.ज्यामध्ये आरोपी कमरुद्दीन दस्तगीर सनदीला त्याच्या मैत्रिणीसोबत आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.कर्नाटक उच्च न्यायालयाने आरोपीला ५ वर्षांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.
न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.हा खटला फौजदारी खटला मानण्याऐवजी त्यांनी सामान्य ब्रेकअप केस मानून शिक्षा रद्द केली आहे. मात्र,न्यायालयापूर्वी ट्रायल कोर्टानेही आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती.
काय आहे प्रकरण👇
२००७ मध्ये आरोपी कमरुद्दीनने ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर प्रेयसीसोबत लग्न करण्यास नकार दिला होता.यानंतर २१ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती.त्यानंतर तिच्या आईने तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.ट्रायल कोर्टाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली,परंतु उच्च न्यायालयाने त्याला कलम ४१७ (फसवणूक) आणि कलम ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत दोषी ठरवले आणि त्याला ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती.त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.आरोपीचे मुलीसोबत शारीरिक संबंध असल्याचे तपासात सिद्ध होऊ शकले नाही; असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.तसेच,आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपही खरा ठरला नाही; अशा परिस्थितीत मुलाला शिक्षा करणे योग्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करीत आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
- Advertisement -