Tuesday, August 11, 2026
Homeगडचिरोली'नाट्यश्री' कवितास्पर्धेत; आठवड्याचे उत्कृष्ट कवी सत्तू भांडेकर….

‘नाट्यश्री’ कवितास्पर्धेत; आठवड्याचे उत्कृष्ट कवी सत्तू भांडेकर….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली’ च्या वतीने नविन वर्षात “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला  स्पर्धा घेण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला  कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते.व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 

या उपक्रमाचे दुसरे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३८ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून  गडचिरोली जिल्ह्यातील,मौजा- गिलगाव (जमीं.) तालूका- चामोर्शी येथील सत्तू भांडेकर यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “अवकाळी पाऊस” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे,कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

कवी सत्तू भांडेकर हे नवोदित कवी असून आरोग्य विभागात उपजिल्हा रुग्णालय,मुल (जि.चंद्रपूर) येथे  आरोग्य सेवक या पदावर कार्यरत आहेत.त्यांचा ‘तू ओढ सागराची’ हा कवितासंग्रह प्रकाशित झालेला असून ते सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे. अनेक पुरस्काराने ते सन्मानित आहेत.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा.अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

या दुसऱ्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रभाकर दुर्गे, सुनील मंगर,तुळशीराम उंदीरवाडे,उपेंद्र रोहनकर, हरिष नैताम,वंदना मडावी,खेमदेव हस्ते,सत्तू भांडेकर , जितू निलेकार,संगीता ठलाल,मुर्लीधर खोटेले,कृष्णा कुंभारे, पुरुषोत्तम लेनगुरे, भिमानंद मेश्राम, मनिषा हिडको, पी. डी. काटकर, मनोहर दुधबावरे, चरणदास वैरागडे, प्रब्रम्हानंद मडावी, स्वप्नील बांबोळे, डॉ. शैलेंद्र भणगे,संजय बन्सल, खुशाल म्हशाखेत्री, प्रतीक्षा कोडापे, गजानन गेडाम, ज्योत्स्ना बन्सोड, अंगुलीमाल उराडे, भारती तितरे, माधुरी अमृतकर, प्रिती चहांदे, प्रमोद बोरसरे, सिध्दार्थ गोवर्धन, डॉ.चंद्रकांत लेनगुरे, मिलिंद खोब्रागडे, मधुकर दुफारे, रुपाली म्हस्के, राजरत्न पेटकर, कु. विधी बन्सोड, सुजाता अवचट इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या ६० दिवसांत हटविण्यात येणार महामार्गांवरील ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि वाहतुकीचा अडथळा रोखण्यासाठी महामार्गाच्या हद्दीत येणारे सर्व बेकायदेशीर ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे पुढील ६० दिवसांत म्हणजेच...

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्रात पनीर सारखे दिसणारे चीज ॲनालॉगचे उत्पादन,साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतांनाही काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगची विक्री...

बेशरमीची हद..! शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनण्यासाठी मुलांना टाकतात जिल्हा परिषद शाळेत.. – कोंढाळा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या नावारूपास आलेल्या "पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा" कोंढाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून पार बदलून...

सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!