Friday, May 1, 2026
Homeनागपूरनागपूरला दीड तास सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले…

नागपूरला दीड तास सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

नागपूर :- दिवसेंदिवस तापणाऱ्या उन्हामुळे काहीली होत असताना आज गुरूवारी सुमारे दीड तास सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने नागपूरला चांगलेच झोडपले.यामुळे उन्हापासून नागपूर करांना दिलासा मिळाला आहे.प्रादेशिक हवामान खात्याने आज गुरूवारी ऑरेंज अलर्ट दिला होता.सकाळी पावणेदहाच्या सुमारास चांगलेच अंधारून आले.पाठोपाठ मुसळधार पावसाला सुरूवात झाली.सुमारे दीड तास पावसाने हजेरी लावली.

गेल्याच आठवड्यात तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहचले होते.त्यामुळे ऊन मी म्हणत होते. मात्र अचानक वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आणि अवघ्या तास दीड तासातच वातावरण थंडगार झाले.हा पाऊस दुपारपर्यंत कायम होता.दीड तासात ४७ मिमी पाऊस झाला.यावेळी ताशी १८ कि. मी.वेगाने वारे वाहात होते.यामुळे शहराच्या खोलगट भागत पाणी साचले.तर अनेक भागात झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याच्या घटना घडल्या.पाऊस येताच शहरातील वीज गेली आणि पाऊस थांबताच परत आली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!