उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय म्हणजेच मेडीकलमध्ये गेल्या वर्षभरात २३७ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.मेडीकलमध्ये जन्मलेल्या एकूण नवजात बालकांच्या तुलनेत २०२२ मध्ये २.४६ टक्के नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.तर गेल्या तीन वर्षांत ६१८ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.माहितीच्या अधीकारांतर्गत हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.कोट्यवधी रुपये खर्च करुनही राज्य सरकारला नवजात बालकांचे मृत्यू रोखण्यात अपयश येत आहेत.नागपूर मेडीकलमध्ये २०२० या वर्षांत ९३५३ बालकांचा जन्म झाला,यापैकी २०५ बालकांचा मृत्यू झाला आहे.
२०२१ या वर्षांत ७४९३ बालकांचा जन्म झाला, यापैकी १७६ बालकांचा मृत्यू झाला आहे.तर २०२२ या वर्षांत ९६३० बालकांचा जन्म झाला,यापैकी २३७ बालकांचा मृत्यू झाला आहे.२०२० ते २०२२ या तीन वर्षांत नागपूर मेडीकलमध्ये तब्बल ६१८ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.कमी असलेले बाळांचे वजन,कमी दिवसांचे बाळ,जन्मजात इन्फेक्शन आणि न्यूमोनिया ही बाळांच्या मृत्यूची प्रमुख कारणे आहेत.