उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-आज जगभरात व्हॅलेंटाईन-डे साजरा केला जात असताना नागपुरात मात्र बजरंग दलाने रॅली काढून व्हॅलेंटाईन-डेला विरोध दर्शवला. बजरंग दलातर्फे छावणी दुर्गा माता मंदिरात हनुमान चालिसाचे सामुहिक पठण करण्यात आले.त्यानंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली.
भालुदान, बोटॅनिकल गार्डन-फुटाळा-अमरावती रोड-लॉ कॉलेज चौक-शंकर नगर-झाशी राणी-व्हरायटी चौक मार्गाने रॅली काढण्यात आली. बजरंगदल का जय कारा, वीर बजरंगी हर हर महादेव अशा घोषणा रॅलीत देण्यात आल्या. संविधान चौकात समारोप रॅलीचा करण्यात आला. यावेळी पुलवामा येथे शहीद झालेल्या शूर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने प्रादेशिक विहिंप मंत्री गोविंद शेंडे, विदर्भ समन्वयक विशाल पुंज, विहिंप समन्वयक प्रशांत मिश्रा, महानगर समन्वयक लखन कुरील आदी शेकडो बजरंगी कार्यकर्ते उपस्थित होते.