- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा ईव्हीएम प्रकाशझोतात आली आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीने ईव्हीएम विरोधात जनआंदोलन उभारण्याची घोषणा करीत आंदोलनाला सुरुवात केली आहे.त्या अंतर्गत नागपुरात इव्हीएमच्या विरोधात काँग्रेसने बाईक रॅली काढून लक्ष वेधले. निवडणुकीत इव्हीएमचा वापर पूर्णपणे बंद करण्यात यावा; अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली.
संविधान चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.त्यांच्या हातात इव्हीएमविरोधात पोस्टर्स होते. इव्हीएम हटाव-लोकशाही बचाव,ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर आणा,लोकशाही वाचवा अशा घोषणा दिल्या जात होत्या.ईव्हीएमविरोधातील तक्रारी व पुरावे दिवसेंदिवस समोर येत आहेत.यामुळे सरकार व प्रशासन घाबरले आहे.प्रत्येक गावात आंदोलन होत आहे.ही चळवळ सोशल मीडियावर अधिक तीव्र करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
काल रविवारी झालेल्या ईव्हीएमविरोधात माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसजणांनी बाईक रॅली काढली.कोराडी,महादुला येथून या रॅलीस प्रारंभ झाला.संविधान चौकात रॅलीचा समारोप झाला. यावेळी केदार यांनी ईव्हीएमला कडाडून विरोध दर्शविला.
केदार म्हणाले,जगभरातील देशांनी नाकारलेल्या इव्हीएमची गरजच काय? देशात काँग्रेसच्या काळात इव्हीएम आली तेव्हा भाजपने कडाडून विरोध केला होता.त्यांनी ईव्हीएमविरोधात एक पुस्तकही काढले होते.यावेळी त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी ईव्हीएमला विरोध करून चळवळ उभारण्याचे आवाहन केले.यावेळी खासदार श्याम बर्वे,आमदार संजय मेश्राम,राजेंद्र मुळक,सुरेश भोयर,जि.
प.अध्यक्षा मुक्ता कोकडे,उपाध्यक्ष कुंदा राऊत, अवंतिका लेकुरवाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
- Advertisement -