Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोलीधान कापणी करणाऱ्या महिलेला ठार करणारी वाघीण अखेर जेरबंद…..-आरमोरी तालुक्याच्या परिसरात पसरली...

धान कापणी करणाऱ्या महिलेला ठार करणारी वाघीण अखेर जेरबंद…..-आरमोरी तालुक्याच्या परिसरात पसरली होती दहशत….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- आरमोरी तालुका मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या रामाळा गावात दिनांक-१९ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास; काळागोटा येथील सात ते आठ महिला शेतात धान कापणी करीत असतांना दबा धरून बसलेली वाघीण टी-१३ हिने अचानकपणे शेतात काम करीत असलेल्या महिलांवर हल्ला चढविला होता; सदर वाघिणीने चढविलेल्या हल्ल्यात आरमोरी तालुक्याच्या काळागोटा येथील महिला ताराबाई एकनाथ ढोडरे अंदाजे वय ६० वर्षे नामक महिलेस वाघिणीने काही अंतरावर दूर फरफटत नेऊन नरडीचा घोट घेतला होता; सहकारी महिलांनी आरडा-ओरड करून महिलेची सुटका तर झाली; मात्र ताराबाई यांची प्राणज्योत मावळली होती.महिला मजुराला वाघिणीने ठार केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता.लोकांचा रोष पाहून वन विभागाने टी-१३  वाघिणीला जेरबंद करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाची एक व गडचिरोली येथून दोन रेस्क्यू टीम बोलाविण्यात आली.वाघिणीचे लोकेशन,पग मार्क शोधण्यासाठी घटनास्थळाच्या परिसरात २५ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले.तसेच घटनास्थळाजवळ शिकार सापळे (बेट) सुद्धा लावण्यात आले.शुक्रवारपासूनच सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते.त्यानुसार रामाळा,चामोर्शी,ठाणेगाव,वैरागड,वनखी,चामोर्शी, रामपूर,आष्टा,कनेरी परिसरातील नागरिकांना जंगलात जाण्यापासून रोखले जात होते.तसेच त्यांच्यात जागृती करण्यासाठी वन विभागतर्फे अभियान राबविण्यात आले.वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक संदीप भारती,परीविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी पवनकुमार जोंग,आरमोरीचे कार्यतत्पर वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम हे टी-१३ वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.त्यानुसार आज सोमवार दिनांक-२३ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास आरमोरी तालुक्याच्या रवी बिटातील मुलूर चक जंगल परिसरातील मधोमध टी-१३ वाघिणीला जेरबंद करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या वाघिणीच्या दहशतीतून सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!