उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- आपणांस काही महिन्यांपूर्वी वा कधीकाळी धान्य खरेदी केंद्रातील घोटाळा झाला; असे माहीत होत असते.नेमके घोटाळे कसे केले जातात; ते जाणून घेऊ या…
असा केला जातो घोटाळा 👇
शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे धान कागदोपत्री खरेदी केली जातात.काही जवळच्या शेतकऱ्यांशी संगनमत करून सातबारे गोळा करून अर्धे तुमचे अर्धे आमचे; नाहीतर काही रक्कम तुमची व काही रक्कम आमची असा ठराव केला जातो.त्यानंतर शासनास कागदोत्री धान्य खरेदी दाखवली जाते.जसे,उदाहरणार्थ ५०० क्विंटल धान्य खरेदी प्रत्यक्ष शेतकरी सातबारे नुसार तर ५०० क्विंटल धान्य खरेदी केवळ सातबारे गोळा करून; यामधे धान्य खरेदी नाही तर सातबारे व इतर कागपत्रे नामधारी असतात.मात्र कागदोत्री खरेदी न केलेले धान्य प्रत्यक्ष गोदामात नसतात.
धान्य विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतात.त्यानंतर खरेदी केंद्रातील कार्यकर्ते संबंधित शेतकऱ्यांकडून बँकेतील जमा झालेली संपूर्ण रक्कम काढून मागतात अर्धे पैसे आपण घेतात आणि अर्धे पैसे शेतकऱ्यांना देतात; त्यातून हा अपहार केला जातो.सापडला तर चोर नाही तर शिरजोर; असा खेळ खेळला जातो.
चोरी कशी सापडली जाते 👇
चोर चोऱ्या तर करतात; मात्र त्यांना माहिती नसते असे नाही.चोऱ्या करणारा एक ना एक दिवस सापडतोच.मात्र केव्हा-केव्हा ज्याच्याशी संगनमत केले जाते; त्याला पैसे मिळाले नाही तर किंव्हा रक्कम पाहून कुणाची पैसे देण्याची इच्छा झालीच नसेल.त्यावेळेस एखादा पैशासाठी तगादा लावत असेल तर त्यावेळेस गोची होऊन प्रकरण उघडकीस येतो.अन्यथा झाकली मूठ सव्वा लाखाची असते.