- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-फेरफारसाठी कुठल्याही प्रकारची रक्कम लागत नसतांना दीड हजार रुपयांची मागणी तर सातबारावर कर्जाचा बोझा चढविण्यासाठी ५०० रुपयांची मागणी,असे दोन्ही एकत्र कामांसाठी दोन हजाराची मागणी करणाऱ्या ३० वर्षीय दिलीपकुमार गोपीप्रसाद रांचे रा.देवलापार,ता.रामटेक,जि.नागपूर ग्रामीण या ग्राम महसूल अधिकाऱ्यास(पूर्वीचे नाव तलाठी)एसीबीच्या(लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पथकाने देवलापार तलाठी कार्यालय परिसरात काल, मंगळवारी १५ जुलैच्या सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अटक करून त्याच्याकडील मोबाइल फोन ताब्यात घेत मोबाईलची तपासणी करून जप्त केला. एवढेच नव्हे तर काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास त्याच्या घराचीही झडती घेण्यात आली.रात्री उशिरापर्यंत देवलापार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.कारवाईबाबत नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकनर यांना माहिती देण्यात आली असून दिलीपकुमारच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८)चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.
तक्रारकर्त्याच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने त्याने दिलीपकुमारकडे शेतीच्या फेरफारसाठी अर्ज केला होता.तक्रारकर्त्याची देवलापार परिसरात वडिजोपार्जित शेती आहे.तलाठी दिलीपकुमारने त्याच्या शेतजमिनीचे फेरफार आणि फेरफार केलेल्या नवीन सातबारावर कर्ज बोझा नोंद करून दिली.त्यानुसार कामाचा मोबदला म्हणून दिलीपकुमारने तक्रारकर्त्याला फेरफारसाठी १ हजार ५०० रुपये आणि कर्ज बोझा नोंदीसाठी पाचशे रुपये अशा एकूण दोन हजार रुपयांची मागणी केली होती.मात्र,तक्रार कर्त्यास लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने एसीबीच्या नागपूर कार्यालयात तक्रार नोंदविली.त्यानुसार एसीबीच्या पथकाने पडताळणी केली.पडताळणी नंतर काल मंगळवारी सायंकाळी तलाठी कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला.तलाठी दिलीपकुमार याने तक्रारकर्त्याकडून दोन हजार रुपये स्वीकारताच पथकाने रंगेहाथ पकडले व ताब्यात घेत अटक केली.सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सागर कवडे,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन कदम,उपअधीक्षक राकेश साखरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मयूर चौरसिया,विवेक पडघान,पोलिस नायक कांचन गुलबसे,सारंग बालपांडे,सचिन किन्हेकर,प्रिया नेवरे यांनी केली.
- Advertisement -

