Wednesday, October 28, 2026
Homeनागपूरदोन सख्ख्या भावांचे कारस्थान; ५०० रुपयांच्या ३८ नकली नोटा टाकल्या एटीएममध्ये..

दोन सख्ख्या भावांचे कारस्थान; ५०० रुपयांच्या ३८ नकली नोटा टाकल्या एटीएममध्ये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-बँकेच्या एटीएममध्ये नकली नोटा भरणा करून चलनात आणू पाहणाऱ्या दोन सख्ख्या भावांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.विशेष म्हणजे,दोघांनी नकली(बनावट)नोटा जमा करण्यासाठी नागपूर जिल्ह्याच्या कामठी शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमचा वापर केला होता.प्रकरणी कामठी पोलिसांनी अंशुल रविशंकर यादव वय ४२ वर्षे व आरुल रविशंकर यादव वय ३६ वर्षे दोघेही रा.मेन रोड,स्वामी विवेकानंद नगर,कामठी शहर,नागपूर या दोन्ही आरोपी भावांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना मंगळवार,१० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपी अंशुल व आरुल यांनी ३१ जुलै २०२५ रोजी कामठी शहरातील नागपूर मार्गावर असलेल्या गरुड चौकातील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये ५०० रुपये किंमतीच्या ३८ नोटा म्हणजेच एकूण १९ हजार रुपये जमा केले होते.या एटीएममधून ५०० रुपयांच्या ३८ बनावट नोटा बँकेला प्राप्त झाल्याची तक्रार भारतीय स्टेस्ट बँकेचे व्यवस्थापक अमोल सूर्यकांत राऊत वय ३९ वर्षे यांनी ३० ऑगस्ट २०२५ रोजी कामठी(नवीन) पोलिस ठाण्यात नोंदविली होती.पोलिसांच्या सूचनेवरून अमोल राऊत यांनी त्या ३८ नोटा नाशिक शहरातील इंडियन सिक्युरिटी प्रेस लॅब येथे तपासणीला पाठविल्या. त्या नोटा बनावट असल्याचा अहवाल इंडियन सिक्युरिटी प्रेस लॅबने ६ फेब्रुवारी २०२६ रोजी बँकेला सादर केला. तत्पूर्वी कामठी (नवीन)पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १७९ अन्वये गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. पोलिसांनी त्या एटीएमच्या खोलीतील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असता अंशुल व आरुल दोघेही रोज त्या एटीएममध्ये रक्कम जमा करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.याच आधारे पोलिसांनी काल शुक्रवारी दुपारी त्या दोघांना ताब्यात घेत अटक केली.कामठी शहरातील प्रथम श्रेणी न्यायालयाने त्या दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनात एपीआय सचिन यादव,नसीम अंसारी,राहुल वाघमारे,किशोर महंत,सोनू मेश्राम यांच्या पथकाने केली.
  • प्रश्नचिन्ह👇
एटीएममध्ये महत्वाचे सेन्सर्स व स्कॅनर लावलेले असतात.संपूर्ण सिस्टम नोटांची तपासणी करते.त्यात असली नोट कोणती व नकली नोट कोणती.मात्र, एटीएमने तब्बल ३८ नकली नोटा स्वीकारल्याच कशा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यातच,आरोपींकडे इतक्या मोठ्या प्रमाणात नकली नोटा आल्या कुठून? असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून माजी प्राध्यापकाची केली हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोथली गावनजीक एका माजी प्राध्यापकाची अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून हत्या केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ...

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही येत्या,२१ फेब्रुवारी २०२७ रोजी...

शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकरी व पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून...

गडचिरोली जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी; आधारभूत धान खरेदीसाठी २० केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ धान खरेदी केंद्रांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!