उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी:- तालुक्यातील खरकाडा ( रनमोचन ) येथील बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिराचे पदाधिकारी व तंटामुक्त गाव समिती तसेच ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून प्रेमी युगुलाच्या संमतीने स्थानिक महादेव मंदिरात बरडकीन्ही येथील प्रेमीयुगुलांचा विवाह संपन्न झाला.अमोल आनंदराव राऊत वय २५ वर्षे असे वर मुलाचे नाव असून कोमल रामभाऊ तलमले वय २१ वर्षे असे वधू मुलीचे नाव आहे.दोघेही बरडकीन्ही गावातील रहिवासी असून एकाच समाजाचे आहेत.
सदर मुलाचे मुली बरोबर गेल्या दोन वर्षांपासून प्रेम संबंध जुळले होते.मात्र काही कारण लग्नासाठी त्यांना आळ येत असल्यामुळे त्या दोघांनीही गावाबाहेर पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.याची माहिती खरकाड्यातील स्थानिक ग्राम पंचायत माजी सरपंच रवींद्र ढोरे,गावातील पोलिस पाटील ढोरे,उपसरपंच ताराचंद पारधी,माजी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष योगेश ढोरे, बारा ज्योतिर्लिंग शिव मंदिराचे माजी सचिव तुकाराम ठाकरे, उपाध्यक्ष राजू पारधी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष हिरामण मुळे यांना देण्यात आली. त्यानुसार मुलीचे व मुलाचे कागदपत्र योग्य लग्नाच्या वयात बसतात काय याची चौकशी करून लेडीज बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिर देवस्थान खरकाडा येथे संपन्न झाला.यावेळी बरडकिन्ही गावातील कैलास बोडकुलवार, जितू माकडे, टिकाराम ढोरे डोंगरगाव, रवी बगमारे पिपळगाव, विनोद दोनाडकर रनमोचन यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला व पुरुष यांची उपस्थिती होती.