Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीदोन दिवसांपासून बेपत्ता असलेला युवक आढळला मृतावस्थेत..-पोर्ला-मोहझरी मार्गावरील गजानन महाराज मंदिर परिसरात...

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला युवक आढळला मृतावस्थेत..-पोर्ला-मोहझरी मार्गावरील गजानन महाराज मंदिर परिसरात आला आढळून…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गेली दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला युवक गडचिरोली पासून आरमोरी मार्गे १३ किलोमिटर अंतरावर असलेल्या पोर्ला-मोहझरी मार्गावरील गजानन महाराज मंदिर परिसरात मृतावस्थेत आढळून आला असल्याची घटना आज,दिनांक- ३ जून रोजी दुपारी ४ च्या सुमारास उघडकीस आली आहे.रितेश नागदेवते वय ४० वर्षे,रा.रामनगर,गडचिरोली असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,रितेश हा दोन दिवसांपासून घरच्यांना न सांगता,घरून निघून गेला होता.घरच्यांनी शोधाशोध केली; मात्र,त्याचा कुठेही थांगपत्ता लागलेला नव्हता.अशातच आज,दुपारच्या सुमारास काही नागरिकांना पोर्ला-मोहझरी मार्गावरील गजानन महाराज मंदिर परिसरात कुणीतरी पँट आणि शर्ट काढून झोपलेल्या अवस्थेत दिसला.जवळ जाऊन बघितले तर अज्ञात युवक मृतावस्थेत असल्याचे दिसून आले.याबाबत गडचिरोली पोलीस प्रशासनास माहिती देण्यात आली.पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन प्रेत शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आला. मात्र,सदरची घटना ही संशयास्पद असल्याचे दिसून येते.घरून निघालेला व्यक्ती शर्ट आणि पँट न लावता घराबाहेर पडूच शकणार नाही.रितेश मृतावस्थेत आढळून आला त्यावेळेस शर्ट आणि पँट लावलेला नसल्याने शंका-कुशंका निर्माण झाली आहे.सदर घटनेचा तपास गडचिरोली पोलिस ठाण्याचे ठाणेदार अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलिस करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!