Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीपोलिसांनी अवघ्या २४ तासात आरोपीला केली अटक…-व्यावसायिक स्पर्धेतून रचला हत्येचा कट…-अहेरी तालुक्यातील...

पोलिसांनी अवघ्या २४ तासात आरोपीला केली अटक…-व्यावसायिक स्पर्धेतून रचला हत्येचा कट…-अहेरी तालुक्यातील पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचे प्रकरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 गडचिरोली :- तीन दिवसांपूर्वी अहेरी तालुक्याच्या छल्लेवाडा गावातील चरणदास गजानन चांदेकर वय ४८ वर्षे,रा.छल्लेवाडा यांना मध्यरात्री घराबाहेर अंगणात झोपलेल्या खाटेवर अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र,काही शरीर जळाल्यानंतर जवळच असलेल्या कुटुंबीयांनी आग विझवली.घटनेत चरणदास गंभीर जखमी झाले असून; त्यांच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.सदर घटने प्रकरणी रेपनपल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.तक्रार दाखल होताच रेपनपल्ली पोलिसांनी गांभीर्याने तपास करीत अवघ्या २४ तासात आरोपीला काल,सोमवारी अटक केली.हरिदास मुंजमकर वय ४६ वर्षे,रा.छल्लेवाडा असे आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की,आरोपी हरिदास मुंजमकर हा डीजे आणि मंडपाचा व्यवसाय करीत होता.अशा स्थितीत चरणदास चांदेकर यांनीही याच गावात डीजे आणि मंडपाचा व्यवसाय सुरू केला.गावातच स्पर्धक निर्माण झाल्याने हरिदासच्या व्यवसायातील आवक कमी झाली.याच व्यावसायिक स्पर्धेतून संतापलेल्या हरिदासने चरणदास चांदेकर यांच्या हत्येचा कट रचला. शनिवारी, १ जून रोजी रात्री चरणदास घराच्या अंगणात झोपले असताना त्यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न हरिदासने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यानुसार आरोपीला अटक करून आज,मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!