गडचिरोली :-दोन दिवसांपासून घरून बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्याचा गडचिरोली शहरातीलच चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील रिलायन्स पेट्रोलपंपासमोरील नालीत मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली असल्याची घटना काल,शुक्रवारी २९ नोव्हेंबरच्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.धनपाल उर्फ विजेश गजानन भलावी वय ४२ वर्षे,रा.पंचवटीनगर,गडचिरोली असे मृत कर्मचारीचे(अभियंता) नाव आहे.
दोन दिवसांपासून बेपत्ता कर्मचाऱ्याचा नालीत सापडला मृतदेह.. – दारूच्या नशेत नालीत पडल्याचा संशय..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मिळालेल्या माहितीनुसार,धनपाल भलावी हे जिल्हा परिषदेच्या सिरोंचा येथील पाणीपुरवठा विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते.ते मूळचे गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील रहिवासी असून त्यांचे कुटुंबीय गडचिरोली येथील आयटीआय परिसरातील पंचवटीनगरात पती-पत्नी किरायाने वास्तव्याने होते. त्यांची पत्नी रामटेक येथे नातेवाईकांकडे गेली होती. दरम्यान भलावी हे बुधवारपासून घरी न परतल्याने शेजारच्यांनी याची माहिती त्यांच्या पत्नीला दिली. पत्नीने पती भलावी बेपत्ता असल्याची तक्रार गडचिरोली पोलिस ठाण्यात दिली होती.दरम्यान,काल शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास चंद्रपूर मार्गावरील नाल्यात काही व्यक्तींना त्यांचा मृतदेह आढळून आला.मृतदेहाचे डोके पाण्यात बुडालेल्या अवस्थेत होते.पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह नालीबाहेर काढला.भलावी यांना दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत ते नालीत पडले असावे, यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

