Wednesday, September 9, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज युनिव्हर्सल कॉन्व्हेंट तथा डेव्हिडकीर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कुल येथे 'समाज परिवर्तन महोत्सव'...

देसाईगंज युनिव्हर्सल कॉन्व्हेंट तथा डेव्हिडकीर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कुल येथे ‘समाज परिवर्तन महोत्सव’ उत्साहात साजरा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या युनिव्हर्सल कॉन्व्हेंट तथा डेव्हिडकीर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कुल येथे समाज परिवर्तन महोत्सव २०२४ मोठया उत्साहात पार पडला.यावेळी विध्यार्थ्यांनी रंगीबेरंगी वेशभूषा परिधान करून नृत्य  सादर करीत पालक व प्रेक्षकांची मने जिंकली. महोत्सवात सामाजिक बाबींवर प्रकाश टाकत सामाजिक कार्य,भूमिका व महत्व विद्यालयाच्या माध्यमातून पटवून देण्यात आले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली होती.स्कूलच्या वतीने आयोजित समाज परिवर्तन महोत्सवाच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्यात आले.
सदर महोत्सव प्रसंगी शाळेचे संस्थापक बी.पी.पडवेकर, शाळेचे मुख्याध्यापक पंकज डी. मेश्राम,अर्चना पडवेकर देसाईगंज,गजबे पोटगाव, स्वीटी बिस्वास गोकुलनगर आदी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाला पालकवर्ग उत्स्फूर्तपणे सहभागी झाले व पालकांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे  संचालन हर्षद सोनपिपरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रामटेके यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.प्रसंगी सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी पालकांचे मुख्याध्यापक पंकज मेश्राम यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी आभार मानले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!