Sunday, June 14, 2026
Homeगडचिरोलीदेसाईगंज औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन…-२१ जून रोजी मेळावा…

देसाईगंज औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन…-२१ जून रोजी मेळावा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे शुक्रवार,दिनांक- २१ जून २०२४ रोजी सकाळी १० वाजता च्या सुमारास “छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे. 

सदर मेळाव्याचे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथि म्हणून देसाईगंज तहसिलदार प्रीती डुडूलकर,गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे,भारतीय स्टेट बँक वडसाचे प्रबंधक राजू एम.मुंडे तसेच आफताब आलम खान,प्रा. लालसिंग खालसा,प्रा.दामोधर शिंगाडे प्राचार्य,संजय कुथे व इतर मान्यवर मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. 

सदर मेळाव्यात दहावी आणि बारावीनंतर शिक्षणाच्या संधी,व्यक्तिमत्व विकास व मुलाखतीचे तंत्र, आयटीआय तसेच महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया, उच्च शिक्षणाच्या संधी,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयांवर तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.रोजगार आणि स्वयंरोजगार व शिक्षण पूर्ण करण्यासाठी कर्जांच्या विविध योजनेविषयी बँकेचे अधिकारी सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सैन्य दलामध्ये नोकरीच्या विविध संधी आणि पोलिस भरती व अग्निवीर योजनेविषयी माहिती दिली जाणार आहे. 

सदर संधीचा लाभ जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी आणि पालकांनी घेण्याचे आवाहन योगेंद्र शेंडे सहा.आयुक्त कौशल्य विकास व उद्योजगता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली व जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोंगिरवार यांनी केले आहे.कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे प्राचार्य सुरेश चौधरी यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन मुलांची भाईगिरी; तलवारीने केक कापून हवेत फिरवली पिस्तूल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मित्राच्या वाढदिवसानिमित्त तलवारीसारख्या हत्याराने केक कापत हवेत पिस्तूल फिरवून तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच भाईगिरी दाखवणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना...

शेतकरी चिंतातुर; मृग नक्षत्रानेही मारली दडी..!

उद्रेक न्युज वृत्त :-पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा एकीकडे हवामानाच्या अनिश्चिततेशी, तर दुसरीकडे वाढत्या उत्पादन खर्चाशी सामना करत आहे.मृग नक्षत्राचा जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही दमदार...

​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात एका प्रसूतीपश्चात मातेला हृदयविकाराचा झटका(Cardiac Arrest)आला असता कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत आणि तत्परतेने सीपीआर(CPR)देऊन मातेचे...

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!