- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(PM-KISAN)योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दिला जाणारा २२ वा हप्ता हा येत्या,शुक्रवार १३ मार्च २०२६ रोजी वितरित करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्योती बिश्नु आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र,खानापारा,गुवाहाटी (आसाम)येथून हा कार्यक्रम पार पडणार असून एका क्लिकवर देशभरातील शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये थेट जमा करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशभरात करण्यात येणार असून राज्यातील व विविध जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबांनाही या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातही विविध स्तरांवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर,कृषी विज्ञान केंद्र, कृषी उत्पन्न बाजार समिती,विविध शासकीय कार्यालये, संशोधन केंद्रे,शेतकरी उत्पादक कंपन्या(FPCs), शेतकरी उत्पादक संघटना(FPOs)तसेच सहकारी पतसंस्था(PACS) येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमामध्ये कृषी व महसूल विभागाचे अधिकारी,कर्मचारी तसेच स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून कार्यक्रमाचे थेट वेबकास्ट पाहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी https://pmindiawebcast.nic.in या लिंकद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहून ऑनलाइन पद्धतीने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.
- Advertisement -

