Wednesday, July 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदेशातील दुसरी सर्वात तरुण खासदार प्रिया सरोजसोबत क्रिकेटपटू रिंकू सिंगचा साक्षगंध संपन्न..

देशातील दुसरी सर्वात तरुण खासदार प्रिया सरोजसोबत क्रिकेटपटू रिंकू सिंगचा साक्षगंध संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पेशाने वकील आणि देशातील दुसरी सर्वात तरुण समाजवादी पक्षाची विद्यमान खासदार प्रिया सरोजसोबत टीम इंडियाचा ऑल राऊंडर क्रिकेटपटू रिंकू सिंगचा साक्षगंधाचा कार्यक्रम काल,रविवारी ८ जून रोजी उत्तर प्रदेशातील लखनौच्या आलिशान सेंट्रम हॉटेलमध्ये मोठ्या थाटात संपन्न झाला.२६ वर्षीय प्रिया सरोज आणि क्रिकेटपटू रिंकू सिंग यांची भेट एका मैत्रिणीच्या माध्यमातून झाली होती.भेटीगाठी वाढत गेल्या आणि सरळ- सरळ विवाह बंधनात अडकण्याचा दोघांनीही निर्णय घेतला.साक्षगंधाच्या कार्यक्रमास समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव,डिंपल यादव,खासदार
इकारा हसन सह राजकारणातील विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती.बीसीसीआयईचे उपाध्यक्ष तथा काँग्रेसचे संसदीय सदस्य राजीव शुक्ला तसेच विशेष अतीथिंनी उपस्थिती दर्शविली होती.उत्तर प्रदेशमधील नावाजलेले नेते तुफानी सरोज हे प्रियाचे वडील असून
प्रिया पेशाने वकील आहे.तिने दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले असून २०२४ मध्ये मछली शहरातून
लोकसभा निवडणूक लढवली होती.त्यात प्रियाने भाजपच्या भोलानाथ सरोज यांचा पराभूत केला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त :- 'नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही' अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच...

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!