- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-शहरातील चंद्रपूर मार्गावरील कारगिल चौक परिसरात रात्रीच्या सुमारास दुचाकीने घराकडे निघालेल्या धावत्या दुचाकीला गावठी डुकराने जोरदार धडक दिली.धडक बसताच दुचाकी वाहन अनियंत्रित होऊन फरफटत गेले.यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आणि रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.मुक्तेश्वर काटवे वय ५६ वर्षे, रा.गडचिरोली शहर असे अपघातात मृत पावलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव असून ते गडचिरोली नगर परिषदेत स्वच्छता व आरोग्य सभापती होते.विशेष म्हणजे,काटवे हे भाजपचे पदाधिकारी होते.मुक्तेश्वर काटवे हे दुचाकीने रात्रीच्या सुमारास गडचिरोली शहरातील कारगिल चौकमार्गे आपल्या घराकडे जाण्यासाठी निघाले होते.जात असतांना वाटेतच गावठी डुक्कर त्यांच्या दुचाकीला येऊन जोरदार आपटला.यात वाहनावरील तोल गेल्याने त्यांना गंभीर मार लागला.त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा रात्रीच दुर्दैवी मृत्यू झाला.मुक्तेश्वर काटवे यांच्या पार्थिवावर आज,शनिवार २८ फेब्रुवारी रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडणार आहे.
- Advertisement -

