Thursday, October 22, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदुकान मालकाने अमेरिकेतील महिलेला लावली शेंडी..-३०० रुपयांचे कृत्रिम दागिने विकले ६ कोटी...

दुकान मालकाने अमेरिकेतील महिलेला लावली शेंडी..-३०० रुपयांचे कृत्रिम दागिने विकले ६ कोटी रुपयांना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये अमेरिकेतील एका महिलेची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या महिलेला राजस्थानमधील दुकानाच्या मालकाने ३०० रुपयांचे कृत्रिम दागिने तब्बल ६ कोटी रुपयांना विकून शेंडी लावल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

महिलेचे नाव आहे चेरीश असून तिने येथील सोने-चांदीच्या दुकानातून सोन्याचे पॉलिश असलेले चांदीचे दागिने खरेदी केले होते.दागिने खरेदी केल्यानंतर ती पुन्हा अमेरिकेला गेली होती.एप्रिल महिन्यात तिने एका प्रदर्शनात हे दागिने ठेवले होते.तथापि,ते बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली.चेरीश ताबडतोब जयपूरला दाखल झाली आणि तिने दुकानाचा मालक गौरव सोनी याला जाब विचारला.मात्र,दुकानमालकाने कानांवर हात ठेवून तिचे आरोप फेटाळून लावले.यानंतर तिने जयपूर पोलिस ठाण्यात सोनीविरुद्ध तक्रार दाखल केली.हे कमी म्हणून की काय तिने अमेरिकेच्या दूतावासाकडेही मदत मागितली.दूतावासाने पोलिसांकडे हे प्रकरण उपस्थित केले आहे.

दुकानमालक वडिलांसह फरारी महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार,२०२२ मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती गौरव सोनीच्या संपर्कात आली होती. गेल्या दोन वर्षांत कृत्रिम दागिन्यांसाठी तिने ६ कोटी रुपये मोजले आहेत.आपला बनाव उघड होणार,या भीतीने गौरव सोनी आणि आणि त्याचे वडील राजेंद्र सोनी फरार झाले आहेत.दोघांचाही शोध सुरू आहे. त्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत; असे पोलिसांनी सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; उद्याला विधान परिषद निवडणूक मतदान..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा काल बुधवारच्या सायंकाळी थंडावल्या असून उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे.नागपूर पदवीधर...

वाघाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र संपता- संपेना,असे चित्र निर्माण झाले आहे.जंगल परिसरात गेलेल्यांना वाघोबा तर सोडतच नाही.अश्यातच वाघ आता चक्क शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांचाही...

पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  अमरावती :-एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज,बुधवार २१ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास अमरावती शहरात उघडकीस...

पदवीधर मतदारसंघ निवडणूक; आता खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष सवलत.. -जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून निवडणूक साहित्य वाटप व्यवस्था व स्ट्राँग रूमची पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या दोन तासांऐवजी आता चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!