Wednesday, June 24, 2026
Homeदेसाईगंजदिवाणजी व तलाठी म्हणतात; सिमांकन केलेल्या झेंड्या मच्छीमारांनी नेल्या उपटून..! - देसाईगंज...

दिवाणजी व तलाठी म्हणतात; सिमांकन केलेल्या झेंड्या मच्छीमारांनी नेल्या उपटून..! – देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा-सिंद्राई घाटातील प्रकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील मेंढा वैनगंगा नदी रेती घाटातील कोट्यवधी रुपयांचे अवैध वाळू उपसा प्रकरण ताजे असतांनाच आता कोंढाळाच्या सिंद्राई रेती घाटावर डल्ला मारण्याचा प्रकार सुरू झाल्याचे आज,बुधवारी २३ एप्रिलला प्रत्यक्ष भेट देऊन  पाहणीवरून दिसून येऊ लागले आहे.अशातच घाटात दहा ते पंधरा रेती उपसा करणाऱ्या गँगकडून उपसा सुरू असतांना संबंधित यंत्रणेने मोजमाप करून  दिलेल्या सिमांकन झेंड्या नसल्याने कंत्राटदाराच्या दिवाणजीला विचारणा केली असता,सिमांकन करण्यात आलेल्या झेंड्या मच्छीमारांनी उपटून नेल्या असल्याचे सांगितले.त्यातच नवलाची बाब म्हणजे, कोंढाळा येथील तलाठी ठाकरे यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता,त्यांनीही एकच उत्तर दिल्याने देसाईगंज तालुक्यात चालले तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.सदर प्रकरणी गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचेकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
माहितीनुसार,कोंढाळा येथील पश्चिमेस असलेला सिंद्राई रेतीघाट हा नवीन रेल्वेच्या कामाकरीता आरमोरी तालुक्यातील एका कंत्राटदारास रेतीघाट प्रस्तावानुसार ४ हजार ८०६ ब्रास करीता देण्यात आला आहे व त्याची लांबी १७० मीटर तर रुंदी ८० मीटर असून एकूण क्षेत्र १ हेक्टर ३६ आर मध्ये तर उपलब्ध वाळूचा थर ३ मीटर आहे.तर GSDA यांनी प्रस्तावित केलेली खोली ही १ मीटर आहे.अशातच प्रस्तावित केलेल्या खोलीनुसार वाळू उपसा न करताच उत्खनन केले जात असल्याने गावातील प्रमुख असलेले तलाठी यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र,याठिकाणी वेगळीच परिस्थिती पहावयास मिळत आहे.अगोदरच मेंढा वैनगंगा नदी रेती घाटातून कोट्यवधी रुपयांचा अवैध वाळू उपसा करण्यात आला आहे.अशातच आणखी कोंढाळा येथे नवे प्रकरण उदयास येऊ लागल्याने परत आंदोलन करावे लागणार काय? त्यातच सिमांकन केलेल्या झेंड्या मच्छीमारांनी नेल्या तर आता त्या झेंड्या कोण आणून देणार? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
(पुढील वृत्त- अवैध वाळू उपसा कश्या प्रकारे होतो?)
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!