Monday, December 15, 2025
Homeगडचिरोली"दिल्ली-मुंबई आमचं सरकार,पण आमच्या गावात आम्हीच सरकार" - देवाजी तोफा - जिल्हाधिकाऱ्यांनी...

“दिल्ली-मुंबई आमचं सरकार,पण आमच्या गावात आम्हीच सरकार” – देवाजी तोफा – जिल्हाधिकाऱ्यांनी मेंढा (लेखा)आदर्श ग्रामसभेस भेट घेत संवाद साधला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) या आदर्श ग्रामसभेला जिल्हाधिकारी  अविश्यांत पंडा यांनी भेट दिली.सदर भेटीत मांडीला- मांडी लावून त्यांनी ग्रामसभा सदस्यांशी थेट संवाद साधला आणि प्रत्यक्ष ग्रामसभेत सहभागी होत स्थानिक स्वराज्य व्यवस्थेचे निरीक्षण केले. जिल्हाधिकारी यांनी एकल सेंटरमार्फत स्थानिक युवकांना ‘बेअरफुट टेक्नीशियन’ म्हणून प्रशिक्षण देण्याची व रोजगार हमी योजनेंतर्गत त्यांच्याकडून कामे घेण्याच्या सूचना दिल्या.
ग्रामसभा अध्यक्ष देवाजी तोफा यांनी गावाच्या आणि ग्रामसभेच्या कामकाजाची माहिती दिली.त्यांनी सांगितले की,२७ एप्रिल २०११ रोजी मेंढा (लेखा) ग्रामसभेला बास विक्रीसाठी ट्रांझिट पास( T.P.) म्हणजेच वाहतूक चालान देऊन वनहक्क मान्यतेचा इतिहास घडला होता.आज या ग्रामसभेला एकूण १८०० हेक्टर सामुहिक वनहक्क मिळाले असून,यापैकी ३०० हेक्टर क्षेत्रात मनरेगा अंतर्गत कामे सुरू आहेत.उर्वरित १५०० हेक्टर जंगल क्षेत्राचे संवर्धन ग्रामसभा करत आहे.
‘आमच्या गावात आम्हीच सरकार’👇
ग्रामसभेतील एकाही नागरिकावर पोलिस केस नाही, निवडणुका बिनविरोध होतात,महिलांचा सहभाग लक्षणीय आहे आणि गावात लोकशाही मूल्यांवर आधारित पारदर्शक निर्णयप्रक्रिया राबवली जाते. गावकऱ्यांच्या मते, “दिल्ली-मुंबई आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार” हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे.ग्रामसभा स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत असून सरकारी योजनांपेक्षा ग्रामस्तरावरच योजना बनवून अंमलबजावणी केली जाते.
अर्थव्यवस्थेला चालना👇
ग्रामसभेच्या नोंदणीकृत कामांमध्ये बांबू लागवड, वनतलाव खोलीकरण,मिश्र रोपवाटिका इत्यादींचा समावेश असून गौण वनोपजाच्या थेट खरेदीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.
यावेळी महिला महाविद्यालय गडचिरोलीचे प्रा.कुंदन दुपारे,समाजकार्य महाविद्यालय गडचिरोलीचे प्रा. भूपेंद्र गौर,जिल्हा परिवर्तन समिती गडचिरोलीचे टेक्निकल ऑफिसर गणेश ठावरे,नोडल अधिकारी सतीश राजू वड,लघुलेखक सिताराम नागोबाजी बुरे, ग्रामपंचायत मेंढाच्या सरपंचा नंदताई दुगा,एकल सेंटरचे समन्वयक निलेश देसाई,चंद्रकांत किचक, तालुका महाग्रामसभा अध्यक्ष बाजीराव नरोटे, ग्रामसभा मांळदाचे अध्यक्ष कृष्ण भुरखुरिया,धानोरा येथील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्रीमती किरण गज्जलवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!