Monday, August 17, 2026
Homeगडचिरोलीदिलखुलास गप्पा-गोष्टी...अरे आम्ही कामगार आहोत; चांगले वागायला शिका..!- प्रेमाचे दोनच शब्द आमच्यासाठी...

दिलखुलास गप्पा-गोष्टी…अरे आम्ही कामगार आहोत; चांगले वागायला शिका..!- प्रेमाचे दोनच शब्द आमच्यासाठी काफी आहेत…- कामगार बंधूंनी खाजगी मालका विषयी व्यक्त केले मत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- कुठलेही व कोणतेहीकामअसो त्यामधे कामगारांचा(मजुर) वर्गांचा संबंध प्रत्यक्षरीत्या येतच असतो.कामगार झाले म्हणून काय झाले; त्यांचीही पत,प्रतिष्ठा व इज्जत असतेच.त्यांनाही भावना असतातच.मात्र याला काहीजण अपवाद असल्याचे सत्य उद्रेक न्युजच्या दिलखुलास गप्पा- गोष्टीच्या माध्मातून कामगार बंधूंनी खाजगी मालकाच्या वागणुकीच्या किस्स्याबाबत आपले मत दिलखुलापणे मांडले आहेत.

आजच्या घडीला विविध क्षेत्रात सरकारी,निमसरकारी, कंत्राट पद्धतीवर व रोजंदारीवर पुरुष व स्त्रिया कामे करतांना दिसून येतात.कोणी कुणाच्या हाताच्या खाली काम करतो तर कुणी कुणाच्या हाताच्या वर कामे करीत असतात.रोजंदारी वर्गातील कामगार बंधू रोजची मजुरी वा हप्त्याची मजुरी घेऊन संसाराचा गाडा हकण्यात मग्न असल्याचे दिसून येते.मिळेल ते काम करणे व कुटुंब चालवणे.रोजंदारीवर कामे करतांना खाजगी मालकाच्या वागणुकीचा किस्सा कामगार बंधूंनी दिलखुलापणे सांगितला आहे.

खाजगी मालक मोठा लखपती आहे.मात्र त्याची मजुरीवर काम करणाऱ्या कामगारांना शिवीगाळ करून तुच्छ लेखत असतो.कुटुंबातील राग वा इतर राग कामगारांवर काढीत असतो.कधीही त्याचे मुखातून प्रेमाचे एकही शब्द निघत नसल्याचे कामगार बंधूंनी आपले मत व्यक्त केले.अशातच ‘अरे आम्ही कामगार आहोत; चांगले वागायला शिका! प्रेमाचे दोनच शब्द आमच्यासाठी काफी आहेत.असे दिलखुलास गप्पा-गोष्टीच्या वेळेस सांगितले.

काम करणारे झाले म्हणून काय झाले; कामगारांच्याच भरवशावर मोठ-मोठी दुकाने,बांधकामे,राईस मिल व इतर ठिकाणी कामे होतात.कामगार बंधूंनी मनात आणले तर सर्वकाही ठप्प पडू शकते.हे विसरून चालणार नाही व कामगार बंधूंना चांगली वागणूक द्या अन्यथा ‘ना घर के ना घाट के’ अशी अवस्था होणार.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!