- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-चांगल्या कार्यासाठी कुणीही सलाम ठोकणार, पण वाईट कृत्यासाठी समोरील व्यक्ती कोण? हे कुणीही विचारणार नाही.अश्याच प्रकारे काल रविवारच्या रात्री सव्वा आठच्या सुमारास भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या मद्यधुंद जवानाने दारूच्या नशेत आय-टेन कार चालवतांना गावी जात असतांना थरकाप उडवला. त्याने तब्बल २५ ते ३० नागरिकांना गाडीने कट मारत गोंधळ घातला.यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही.मात्र, घटनेनंतर ग्रामस्थांनी पाठलाग करत त्याला पकडून चांगलेच धुतले.हर्षपाल महादेव वाघमारे वय ४० वर्षे रा.हमलापुरी,ता.रामटेक,जि.नागपूर असे जवानाचे नाव आहे.हा भारतीय सैन्य दलात आसाम येथे कार्यरत असून काही दिवसांपूर्वी सुटीवर गावी आला होता.त्याला दारूचे व्यसन असल्याचे सांगण्यात येते.
रविवारी रात्री दारूच्या नशेत त्याने आपली एम.एच.४०-सी.ए.६३७७ क्रमांकाची आय टेन कार चालवण्याचा प्रयत्न केला.गावी हमलापुरीकडे जातांना नगरधन गावातील साई मंदिर व दुर्गा चौक मार्गे त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्यावरील २५ ते ३० लोकांना कट मारून जीवघेणा धोका निर्माण केला.पळ काढण्याच्या प्रयत्नात त्याची कार हनुमान मंदिर परिसरात झाडावर आदळली आणि नंतर रस्त्यालगतच्या नाल्यात जाऊन पडली.घटनास्थळी संतप्त ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करत पकडुन चांगलेच बदडवले.यानंतर रामटेक पोलिसांना या घटनेची माहिती दिली.तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले.मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हर्ष वाघमारेला ताब्यात घेत रामटेक येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. पुढील तपास रामटेकचे ठाणेदार रवींद्र मानकर करीत आहेत.
- Advertisement -

