Thursday, July 30, 2026
Homeनागपूरदबा धरून बसलेल्या बिबट्याने महिलेवर चढवला हल्ला; हल्ल्यात महिला ठार…

दबा धरून बसलेल्या बिबट्याने महिलेवर चढवला हल्ला; हल्ल्यात महिला ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- उमरेड शहरालगत उत्तर उमरेड वनपरिक्षेत्र  भागात बिबट्याचा संचार वाढला असून त्याचे नित्याने दर्शन होऊ लागले आहे.आज,गुरुवार १६ मे रोजी सकाळी साडे नऊ वाजता भिवगड बीट अंतर्गत तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याने चढविलेल्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना घडली.या घटनेमुळे गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.मृतक महिलेचे नाव कल्पना उत्तम चौधरी वय ३९ वर्षे रा.भिवगड असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,कल्पना चौधरी,निर्मला श्रीरामे,पुष्पा परचाखे,चंद्रकला राऊत,कल्पना काटसरपे आणि इतर काही जण तेंदूपत्ता संकलनासाठी भिवगड वनक्षेत्र परिसरात गेले होते. अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने कल्पना यांच्यावर हल्ला चढविला.नरडीचा घोट घेतल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनखात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.मृतक महिलेच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत म्हणून एक लाख रुपयाची मदत आणि अंत्यसंस्कारासाठीचा खर्च दिल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.मृतक महिलेच्या पश्चात दोन अपत्य असून १६ वर्षीय मुलगा व १३ वर्षांची मुलगी आहे.या घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात; अशी मागणी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन...

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!