Thursday, September 24, 2026
Homeमूलत्याने झडप घातली; अन् युवा शेतकऱ्याने झाडावर सैराभैरा चढून वाचविले प्राण...- मूल...

त्याने झडप घातली; अन् युवा शेतकऱ्याने झाडावर सैराभैरा चढून वाचविले प्राण…- मूल तालुक्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर (मूल) :-मूल तालुक्यातील चितेगाव येथील युवा शेतकरी महेश तोडासे यांच्या सोबत चित्तथरारक घटना काल २२ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली.महेश नेहमीप्रमाणे आपल्या शेतात सकाळी लाखोरी खोदण्यासाठी जात असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर झडप घातली व जखमी केले.वाटेत सोबतीला कुणीच नव्हते;समोर फक्त वाघ असल्याने महेशने कसेबसे स्वतःला सावरले आणि वाघाला दूर सारत क्षणाचाही विलंब न करता जवळच असलेल्या झाडावर चढल्याने तो सुदैवाने थोडक्यात बचावला.डोळ्यासमोर मृत्यू पाहून त्यावर त्याने विजय मिळविला.प्रसंगावधान साधून जखमी झालेल्या महेशने काही वेळाने वाघ निघून गेल्यावर झाडावरून खाली उतरून गावात आपबिती सांगितली.जखमी महेशला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.उपजिल्हा रुग्णालयात महेश यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. 

मूल तालुक्यात वन्य प्राण्यांच्या हल्ला करण्याच्या घटना वाढतच चालल्या असल्याने यावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्या; अशी मागणी शेतकरी बांधव व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

कृषी विभागातील तब्बल १४ हजार ४४५ तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांना एक दिवसांचे वेतन..

उद्रेक न्युज वृत्त :-निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेतकरी बांधवांना फटका सहन करावा लागतो आहे. कधी अवकाळी पाऊस,तर कधी किडीचा प्रादुर्भाव,तर कधी ऐन हंगामात धो-धो पावसामुळे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!