Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोली'तो' बलात्कारी डॉक्टर बोगस की अधिकृत? कारनामे छपवायसाठी यंत्रणांना वाटायचा पाकिटे.. -...

‘तो’ बलात्कारी डॉक्टर बोगस की अधिकृत? कारनामे छपवायसाठी यंत्रणांना वाटायचा पाकिटे.. – गडचिरोली जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातील ग्रामीण भागांत वैद्यकीय पदवी नसलेल्या बोगस  डॉक्टरांचा कारवाई अभावी मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे.वाऱ्यावर सोडलेल्या बोगस डॉक्टरांकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसतांना शहरी भागांसह गावगाड्यात रुग्णालये थाटून उपचार करतांना दिसून येत आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अश्या बोगस डॉक्टरांकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्यानेच हा सर्व प्रकार घडू लागला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभाग बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारण्यास कुठला मुहूर्त बघत आहे; देव जाणे.कोरोना महामारीच्या काळातही बोगस डॉक्टरांनी लाखो रुपयांची माया गोळा केली.मात्र,त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने अशा बोगस ‘मुन्नाभाईंचे’ मनोबल अधिकच वाढल्याचे चित्र आहे.अश्यातच तीन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने जिल्ह्यातील समाजमन सुन्न झाले आहे.राज्यात  महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतांनाच गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका नराधम डॉक्टरने उपचार करण्याच्या बहाण्याने पदवीचे शिक्षण घेणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीला आपल्या केबिनमध्ये बोलावून बलात्कार केल्याची घटना बुधवारी २ जुलै २०२५ रोजी कोरची तालुक्याच्या बोरी गावात घडली.सुभाष हरप्रसाद बिस्वास वय ४८ वर्षे रा.बोरी,ता.कोरची, जि.गडचिरोली असे तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधम डॉक्टरचे नाव असून त्याचे बोरी गावातच खासगी रुग्णालय आहे.ईश्वरानंतर ज्याला आपण देव मानतो व बरे होण्यासाठी ज्याच्याकडे जातो,अश्यानेच अब्रू लुटली.प्रकृतीवस्थामुळे ज्या डॉक्टरवर तरुणीने विश्वास ठेवला त्याच डॉक्टरने विश्वासघात केल्याने अश्यांना फासावर लटकवलेले बरे,असे बोरी गावातील तसेच परिसरातील नगिकांचे म्हणजे आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी सुभाष हरप्रसाद बिस्वास हा कोरची तालुक्याच्या बोरी गावातील रहिवासी नसून तो बाहेर जिल्ह्यातील आहे. गेली १० ते १५ वर्षांपासून तो परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून उपचार करीत आहे.त्याने यापूर्वीही विनयभंग करण्यासारखे प्रकार केलेले असल्याची माहिती एका नागरिकाने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितली.१६ सप्टेंबर २०२३ रोजी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्याला यातून बरेचदा वाचविण्यात आलेले आहे.सापडला की,तो पायापोटी लागून प्रकरण रफादफा करण्यात येत होते.विशेष म्हणजे,आरोपी सुभाष बिस्वास हा बोरी गावात आपल्या कुटूंबीयांसह नाही तर एकटाच वास्तव्यास राहत होता.त्यातच उघडकीस आलेले कारनामे छपवायसाठी तो काही यंत्रणांना पैश्याचे पाकिटे वाटप करून तोंड बंद करायचा.तरुणी बाबत घडलेल्या प्रकरणावरही पडदा घालण्यात येत होता.मात्र, छत्तीसगड राज्यातील एका आमदारांनी उचल केल्याने सदर प्रकरण उजेडात आले.अशी खात्रीशीर माहिती सूत्रांकडून देण्यात आली.त्यातच कोरची तालुक्यात बोगस डॉक्टरांनी धुमाकूळ घालून गोर-गरिबांना लुटण्याचे काम सुरू केलेत.अश्यांवर कुणाचाही धाक-दरारा नसल्याने ‘चलती का नाम गाडी’ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे,हे विशेष.
कोरोनाचा काळ नागरिकांसाठी आपत्तीचा ठरला होता.अनेक कुटुंबांचे कोरोनावरील उपचार घेतांना हातातील पैसे गेले.अनेकांनी जमीन विकून उपचार केला.त्यातच बोगस डॉक्टरांचेही चांगलेच फावले.ज्या काळात ग्रामीण भागांत रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले होते,त्या काळात या डॉक्टरांनी लाखो रुपयांची लक्ष्मी गोळा केली.पदवी नसतांनाही अशा  डॉक्टरांकडून उपचार घेतांना अनेक कुटुंबातील प्रतिष्ठित व्यक्तींना जीव गमवावा लागला.अशी अनेक उदाहरणे कोरोनाच्या लाटेत पाहायला मिळाली. अशावेळी पदवी नसलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची गरज होती,जी दुर्दैवाने होऊ शकली नाही. त्यामुळे अशा अनेक बोगस डॉक्टरांनी लाखोंची मालमत्ता जमा केली आहे.परंतु आरोग्य विभागाकडून या प्रकारावर एकदाही कारवाई झालेली नाही.ग्रामीण भागांत हे डॉक्टर मोठ्या प्रमाणात सक्रिय होत आहेत.शिवाय ते आता खासगी दवाखानेही सुरू करीत आहेत.नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक बनलेल्या या विषयाला प्रशासन गांभीर्याने घेत नाही.त्यामुळे आता प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेत बोगस डॉक्टरांवर कारवाई करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.आरोग्य विभागाकडे एखाद्याची जो पर्यंत तक्रार येत नाही,तो पर्यंत कारवाई होणार नाही,असे सांगितले जाते.पण स्वतःहून पुढाकार घेतल्याने खिशातले पैसे संपतात की काय? गोर-गरीब, सर्वसामान्य जनतेचे जीव पैस्यापेक्षा श्रेष्ठ आहे काय? अश्यांचा वाली कोण? असा विचार मनात घर करून सोडतो आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!