Sunday, September 27, 2026
Homeनागपूर'तुम्ही दारू प्या'..,चकणा खा..सोबतच कोंबडी खा..पण आमची विम्याची रक्कम द्या..! -शेतकऱ्यांचा अनोखा...

‘तुम्ही दारू प्या’..,चकणा खा..सोबतच कोंबडी खा..पण आमची विम्याची रक्कम द्या..! -शेतकऱ्यांचा अनोखा आंदोलन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- शासन स्तरावरून पीक विमा भरण्याबाबत शेतकऱ्यांना एकप्रकारे भुरळच घातली जाते आहे.जेव्हा विमा भरून नुकसान होत असते; अशा वेळेस शेतकऱ्यांना भरपाईसाठी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागतात.त्यानंतर हताश होऊन मुर्दाड प्रशासनास जागे करावे लागते.असाच प्रकार नागपूर जिल्ह्याच्या काटोल-नरखेड तालुक्यातील काही शेतकऱ्यांना २०२३-२४ मधील खरीप हंगामातील सोयाबीन पीक विम्याचा पहिला हप्ता मिळाला.मात्र, बहुसंख्य शेतकरी अद्यापही पीक विम्याच्या रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.यासाठी २० जूनला रितसर तक्रार करण्यात आली.परंतु उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी काहीच कार्यवाही केली नसल्याने काल, ‘जबाब दो यात्रा’ चे संयोजक सागर दुधाने यांच्या नेतृत्त्वात शेतकरी कार्यालयात धडकले. उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलवर जिवंत कोंबडी,दारूच्या बॉटल्स,आंबे आणि चिल्लर पैसे ठेऊन ठिय्या आंदोलन केले.अशातच ‘तुम्ही काहीही खा अन् प्या’ पण विम्याची रक्कम द्या..! अशी भूमिका शेतकऱ्यांनी बजावली.

खरीप हंगामातील सोयाबीन पीक विम्याच्या पहिल्या हप्त्यापासून बहुसंख्य शेतकरी वंचित आहेत.अनेकदा निवेदन,तक्रारी करूनही ढिम्म प्रशासन हलत नसल्याने काल,कृषी उपविभागीय कार्यालयात सकाळी ११ वाजता शेतकरी धडकले.उपविभागीय कृषी अधिकारी चौधरी यांना बोलवा,त्याशिवाय आम्ही जाणार नाही; अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. उपविभागीय कृषी अधिकारी हे नागपूरला दौऱ्यात असल्याने ते कार्यालयात उपस्थित नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.त्यामुळे उपविभागीय कृषी अधिकारी येईपर्यंत हलणार नाही; अशी आग्रही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.शेतकऱ्यांचा संताप बघता कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली.पीक विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी,पीक विमा तालुका प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी काटोल-नरखेड यांची ३ जुलैला दुपारी १२ वाजता बैठक बोलविण्याचे लेखी पत्र मिळाल्यानंतर शेतकरी कार्यालयातून निघाले. जवळपास ५ तास शेतकरी कार्यालयात बसून होते. रोशन सातांगे,मनोहर भस्मे,गजानन भस्मे,विनायक पाटील,शालीक राऊत,प्रदीप धोटे,देवेंद्र ठाकरे आदी शेतकरी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांना तातडीने पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील तीन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हेडरी येथे हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या...

आज सर्व बँकांची दारे राहणार खुली..!

उद्रेक न्युज वृत्त :-विविध बँकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आज,रविवार २७ सप्टेंबरला देशभरातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखा खुल्या राहणार आहेत.या...

मलेरिया नियंत्रणासाठी व्यापक मोहीम; रुग्णसंख्येत मागील वर्षाच्या तुलनेत ४१.६ टक्के घट.. -५६६ रुग्णांच्या बँक खात्यात २ लाख ८३ हजार रुपयांची बुडित मजुरी जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात हिवताप(मलेरिया)नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक,निदानात्मक व उपचारात्मक उपाययोजनांची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे.दुर्गम व डोंगराळ भागातील...

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!