संपादक/सत्यवान रामटेके
उद्रेक न्युज वृत्त :- सध्याच्या घडीला व यापूर्वीही आपण अनेक जणांनी बघितले असेल की,गावामध्ये ग्रामपंचायत मार्फतीनेच नव्हे तर इतरही शासकीय विभागांच्या वतीने सार्वजनिक हिताची कामे केली जातात.मुख्यत्वे म्हणजे गावामध्ये कोणत्याही विभागाकडून काम केले जात असले तरीही ‘त्या’ गावातील ग्रामपंचायतीचा ठराव मिळाल्याशिवाय कुठलेही काम केले जात नाही.मात्र तुम्हाला-आम्हाला ‘गण्या’ बनविण्याचे काम अनेक विभागांकडून तसेच ग्रामपंचायतीद्वारे केले जातेय; याची हल्ली प्रचिती निदर्शनास येऊ लागली आहे.
गावातील ग्रामपंचयतीतर्फे सार्वजनिक हिताची सर्वच कामे केली जातात; असे नाही.काही कामे एखाद्या आजी-माजी पदाधिकारी,छोटे-मोठे कंत्राटदार,शिकाऊ उमेदवार,कलेबाज व इतर कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या मासिक सभेत ठराव घेऊन सार्वजनिक हिताच्या कामांचे ठराव दिले जातात. त्यानुसार सर्व कार्यकर्ते अमुक-तमुक काम पैका खर्च करून गावाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात; असे अनेकांना भासवित असतात. अशातच कलेबाजांनी भूमिका बजावल्यानंतर अनेक शासकीय विभाग रांगेत उभे होऊन गावातील ग्रामपंचायत हद्दीमध्ये कामे करण्यास पुढाकार घेतांना दिसून येतात.जसे,सार्वजनिक बांधकाम विभाग,कृषी विभाग,जिल्हा परिषद बांधकाम विभाग,सिंचाई विभाग,सामाजिक वनीकरण विभाग,पाटबंधारे विभाग व इतर विभागांच्या मार्फतिने सार्वजनिक हिताची कामे केली जातात.सार्वजनिक हिताची कामे केली जात असली तरीही अशा सर्व विभागांना ‘त्या’ गावातील ग्रामपंचयतीच्या कामाचा ठराव आवश्यकच असतो.त्याशिवाय कामास प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळणारच नाही.मग ते काम जिल्हा वार्षिक नियोजनाचे असो वा आमदार,खासदार फंडाचे असो वा महामंत्र्यांचे असो ग्रामपंचायतीचा ठराव हा अनिवार्य असतोच; मात्र काही शासकीय कार्यालयातील अधिकारी वा कर्मचारी वर्ग सार्वजनिक हिताचे काम करीत असतांना ‘तुमच्या ग्रामपंचायतीचा सदर कामाशी काहीही संबंध नाही’ असे बेधडकपणे सांगित असतात.व ग्रामपंचायत पदाधिकारीही म्हणतात की, ‘ते काम आपले नाही’ त्यामुळे आम्ही हस्तक्षेप कसे करणार? अशी पोमडेंगी फेकतांना दिसून येतात.
असाच एक प्रसंग एका ग्रामपंचायत हद्दीमध्ये काही महिन्यांपूर्वी घडला होता.त्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये रस्त्याचे काम बांधकाम विभागातर्फे सुरू करण्यात आले होते.त्यानुसार एका सुजाण नागरिकाने ग्रामपंचायतीस सदर बांधकामासंबंधी विचारणा केली असता; आम्हाला काहीच माहिती नाही व त्या कामात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही.असे म्हटले गेले. तश्याच प्रकारचे उत्तर बांधकाम विभागातर्फे आले की,सदर काम आमच्या विभागाचे आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीचा प्रश्नच नाही.असे म्हणून हात झटकण्यात आले.मात्र एका सुजाण नागरिकाने सदर बांधकामाविषयी धारेवर धरले व त्यांना विचारणा केली की,तुम्ही कुणाच्या गावामध्ये काम करीत आहात; तुमचा विभाग कोणताही असो; मात्र आम्ही गावचे नागरिक असल्याने त्या कामाविषयी माहिती ही गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ज्यांनी विचारणा केली वा कागदपत्रे मागविली तर देणे हे तुमचे काम आहे.सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली.मात्र फटाके फुटल्याने सर्व विभागातील कर्मचारी वटणेवर आले.गावामध्ये कोणत्याही विभागाचे काम जरी केले जात असले तरीही ‘त्या’ गावातील ग्रामपंचायतीचा ठराव मिळाल्याशिवाय कुठलेही काम केले जात नाही.हे सर्वसामान्य नागरिकांनी ध्यानी-मनी घेऊन गावातील सार्वजनिक हिताच्या सर्वच कामांविषयी जाब विचारला पाहिजे.