Saturday, September 5, 2026
Homeकुरखेडातळेगावच्या इसमाची गळफास घेऊन आत्महत्या.. - कुरखेडा तालुक्यातील घटना..

तळेगावच्या इसमाची गळफास घेऊन आत्महत्या.. – कुरखेडा तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या तळेगाव येथील एका ५० वर्षीय इसमाने घरी असलेल्या जांबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल,रविवारी ८ जून रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.दूधराम किसन मडावी,रा.तळेगाव, ता.कुरखेडा,जि.गडचिरोली असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.दूधराम मडावी हे स्वतःचे चारचाकी वाहन चालवून संसाराचा गाडा हाकत होते.
माहितीनुसार,दूधराम मडावी यांच्याकडे स्वतःचे दोन चारचाकी वाहन असून घटनेच्या दिवशी ट्रॅव्हल्स सारखे असलेले एक वाहन बुकिंग होते.सकाळच्या सुमारास दूधराम यांनी वाहनाची सफाई करून बुकिंगवर जाण्याची संपूर्ण तयारी केली होती. अश्यातच सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी अचानकपणे टोकाचे पाऊल उचलत घरी असलेल्या जांबाच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपवली.सदरची घटना घरच्यांच्या लक्षात येताच कुटुंबीयांना मोठा हादरा बसला.घटनेची माहिती कुरखेडा पोलिसांना कळताच घटनास्थळी दाखल होत पंचनामा करीत कुटूंबीय व गावकऱ्यांच्या मदतीने गळफास घेतलेले प्रेत खाली उतरवुन कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेचा पुढील तपास कुरखेडा पोलीस प्रशासन करीत आहे.दूधराम मडावी यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे.एक मुलगा शासकीय नोकरीवर असून दूधराम हे घरी असलेले वाहन स्वतःच चालवायचे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!