Saturday, October 24, 2026
Homeकुरखेडातंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने प्रेमीयुगुल विवाहबद्ध…-कुरखेडा तालुक्याच्या गेवर्धा येथील समिती..

तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने प्रेमीयुगुल विवाहबद्ध…-कुरखेडा तालुक्याच्या गेवर्धा येथील समिती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा(गडचिरोली) :- सध्याच्या घडीला गडचिरोली जिल्ह्यातील काही तंटामुक्त समित्या सोडल्या तर उर्वरित गावातील तंटामुक्त समित्या हे केवळ कागदोपत्री तसेच नामधारी असल्याच्या लक्षात येत आहेत.काही प्रकरणे अंगलट येणार,म्हणून निर्णय घेण्यास पुढे धजावित नाही.काही तंटामुक्त समितीचे पदाधिकारी म्हणतात की,आम्ही भानगडीत कशाला पडू? आम्हाला काय मिळते? ‘आम्ही बिन पगारी अन् फुल्ल अधिकारी’ असल्याने गावातील तंटेच मिटविण्यात असमर्थता दर्शवली आहे.मात्र,या सर्वांना अपवाद असलेली तंटामुक्त समिती ती म्हणजे कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथील तंटामुक्त समिती आजही गावातील तंटे वा इतरांना न्याय मिळवून देण्याचे काम करीत आहे.अशातच तीन दिवसांपूर्वी बाहेर ठिकाणच्या प्रेमीयुुगुलांचे विवाह लावून दिले आहे.कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथील तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने प्रेमीयुगुल विवाहबद्ध झाले.विजय सुभाष कामडे रा.चनकापूर ता.सावनेर जि. नागपुर आणि रविना रवींद्र तायवाडे रा.पोटा ता. सावनेर जि.नागपुर यांचे मागील एक वर्षांपासून प्रेमसंबंध होते.जवळपास ३ महिन्यापूर्वी पासुन विजय हा राजलक्ष्मी इंटरप्राईजेस कंपनी गेवर्धा या ठिकाणी चालक म्हणून काम करीत आहे.दोघांनी तंटामुक्त समिती पदाधिकारी ग्राम पंचायत गेवर्धा यांची भेट घेऊन लग्न लावून देण्याची विनंती केली.तंटामुक्त समितीने यासंदर्भात निर्णय घेऊन सोमवारी,दिनांक-३ जून रोजी तंटामुक्त समिती पदाधिकारी व गावकऱ्यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह पार पाडण्यात आला.विवाह प्रसंगी तंटामुक्त समिती अध्यक्ष राजु बारई,ग्राम पंचायत सदस्य रोशन सय्यद,ग्राम पंचायत सदस्य कल्पना कांबळे,पोलिस पाटील भाग्यरेखा वझाडे,ग्रामकोष अध्यक्ष राजेंद्र कुमरे, तंटामुक्ती सदस्य सुधीर बाळबुद्धे, योगेश गायकवाड,ताहीर शेख,योगेश नखाते,भुवनेश्वर कांबळे,महिला ग्रामसंघाचे अध्यक्ष हिना पठाण, शांतीदेवी पालीवाल,प्राजक्ता कोसरे,कुसुम मस्के,लता डोंगरवार,ग्रापं कर्मचारी कृष्णा मस्के,अमिता नाहामूर्ते आदी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!