- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-ट्रक चालकाचा निष्काळजीपणा एका दुचाकीस्वाराच्या जीवावर बेतला.चालकाने रस्त्यावरच ट्रक उभा केल्याने एका दुचाकीस्वाराचा त्यावर धडकून मृत्यू झाल्याची घटना अजनी उड्डाणपुलावर घडली. अपघातानंतर बराच वेळपर्यंत अजनी चौकातील वाहतूक प्रभावित होती.मोहम्मद फारूख मोहम्मद हारून वय ३८ वर्षे रा.इस्माईलपुरा,कामठी असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी फारूखचा सहकारी मुजम्मिल अशरफ मोहम्मद अशफाक वय २५ वर्षे च्या तक्रारीवरून आरोपी ट्रक चालकावर गुन्हा नोंदविला आहे.विनोद संजय नाईक वय ३५ वर्षे रा.पुलगाव असे आरोपी ट्रक चालकाचे नाव आहे.
मंगळवारी सकाळी विनोद ट्रक घेऊन जात होता. अजनीकडून प्राईड हॉटेलकडे जातांना उड्डाणपुलावर अचानक त्याच्या ट्रकमध्ये बिघाड आल्याने त्याने रस्त्यावरच वाहन थांबवले.मात्र,सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली नव्हती.सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास फारूख आणि मुजम्मिल उड्डाणपुलावरून वर्धा मार्गाकडे जात होते.मध्येच ट्रक उभा असल्याचा अंदाज नसल्याने फारूख आणि मुजम्मिलचे वाहन ट्रकवर आदळले.यात गंभीर जखमी होऊन फारूखचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच धंतोली पोलिस घटनास्थळी पोहोचले. अपघातामुळे रस्त्यावर वाहनांची लांबच लांब रांग लागली होती.वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिसांना दुसऱ्या बाजूने वाहतूक वळवावी लागली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी चालक विनोद याला अटक केली आहे.
- Advertisement -