Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीट्रक आपटणार तोच स्कुटी झाली स्लिप; डोक्याला गंभीर मार लागून शिक्षिकेचा मृत्यू..!...

ट्रक आपटणार तोच स्कुटी झाली स्लिप; डोक्याला गंभीर मार लागून शिक्षिकेचा मृत्यू..! – सकाळच्या घटनेने हळहळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शहरात भीषण अपघात होऊन एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार १० डिसेंबरच्या सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान गडचिरोली शहरातील बी-फॅशन मॉलसमोर घडली. ममता धर्माजी बांबोळे वय ४२ वर्षे असे अपघातात मृत पावलेल्या शिक्षिकेचे नाव असून त्या मूळच्या पोर्ला येथील रहिवासी असून कॉम्प्लेक्स परिसराच्या आयटीआय-गोकुळ नगर बायपास रोड परिसरात आपल्या आईकडे वास्तव्यास होत्या.गडचिरोली शहराच्या कारमेल शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
माहितीनुसार,ममता बांबोळे या नेहमीप्रमाणे आपल्या स्कुटीने शाळेत जात होत्या.गडचिरोली-चंद्रपूर रोडवरील बी-फॅशन मॉलजवळ जाताच एमएच ३४ बी झेड १११३ क्रमांकाचा सिमेंट भरलेला ट्रक मार्गावरून जात असतांनाच ट्रक स्कुटीला आपटणार तोच स्कूटी स्लिप झाली.यात ममता बांबोळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागून डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊ लागला.जबर मार लागल्याने त्या मार्गावरच गडबळ्या लोळू लागल्या,पण तात्काळ त्यांच्या मदतीला कुणीही धावले नाही.बघ्यांनी केवळ बघ्याची भुमिका घेतली होती.घटनेची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्यांना  जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविले. पण,काही वेळातच त्यांचा मृत्यु झाला.त्यांच्या अपघाती मृत्यूने शहरासह शैक्षणिक वर्तळात हळहळ व्यक्त केली जात आहे.गडचिरोली पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतला असून ट्रकचालक प्रसाद मिश्रा याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलिस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!