Tuesday, August 18, 2026
Homeनागपूरट्युशनला जाते सांगून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने घर सोडले अन् पैसे कमविण्यासाठी...

ट्युशनला जाते सांगून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने घर सोडले अन् पैसे कमविण्यासाठी थेट पोहोचली नेपाळला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-आजच्या दगदगीच्या जीवन शैलीत पैश्याला इतके महत्व आलेत की,काहीजण पैश्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात.आपल्या नजरेसमोर एखादा छानसे कपडे वा इतर साहित्य खरेदी करीत असेल तर आपलीही इच्छा महागडी वस्तू वा इतर साहित्य खरेदी करण्याची होत असते.मात्र,त्यासाठी आपल्याकडे पैसा असणे गरजेचे आहे.अन्यथा आपल्या स्वप्नाचा चुराडा झाल्याशिवाय राहणार नाही.अश्यातच काहींच्या घरची परिस्थिती बेताचीच असते.त्यामुळे अनेकजण पैसे कमविण्याचा विचार करून स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात.अश्याच प्रकारे नागपुरातील एका अल्पवयीन १५ वर्षाच्या मुलीने ट्युशनला जाते सांगून,घर सोडून चक्क पैसे कमविण्यासाठी थेट नेपाळला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.पोलिसांनी मध्य प्रदेश,बिहार या राज्यांतील शेकडो सीसीटीव्ही फुटेजेस तपासल्यानंतर नेपाळमध्ये जाऊन तिचा शोध लावला व तिला पालकांच्या हवाली केले.कळमना पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.संबंधित १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही शिक्षण घेत आहे.तिच्या घरची स्थिती हलाखीचीच आहे.इतर मैत्रिणींना पाहून तिलादेखील आपल्याकडे पैसे असावेत,असे वाटत होते.नेपाळमध्ये कमी वेळात जास्त पैसे मिळू शकतात, अशी तिला माहिती मिळाली.त्यावरून तिने २ मे रोजी घर सोडले.घरातून निघतांना तिने ट्युशनला जाते,असे सांगितले होते.बराच वेळ झाला तरी ती घरी न आल्याने घरच्यांनी अखेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिचा शोध सुरू केला होता.पोलिसांनी विविध परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता ती रेल्वेस्थानकावर गेल्याचे कळाले.तेथून ती रेल्वेने तिरोडी,मध्य प्रदेशात पोहोचल्याची बाब स्पष्ट झाली.पोलिसांचे पथक तिरोडीला गेले व तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले.तेथून ती मुलगी बिहारमधील पटना रेल्वेस्थानकावर गेली आणि बसने नेपाळ सीमेवरील बिट्टामोर येथे गेल्याची बाब सीसीटीव्हीतून समोर आली.पोलिसांचे पथक तेथे पोहोचले.तेथेदेखील पोलिसांनी सीसीटीव्हीतून शोध घेतला. तसेच परिसरात तिचा फोटो दाखवून विचारणा केली. ती मुलगी सीताबढी बसने गेल्याचे कळाले.पोलिसांनी त्या हिशेबाने शोध सुरू केला व ती नेपाळमधील जनकपूर येथील रहिवासी महिला देवी विनोद पाठककडे असल्याची माहिती मिळाली.पोलिस तेथे गेले असता,ती मुलगी महिलेकडेच होती.पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन समुपदेशन केले.मुलीला जनकपूरमधून नागपुरात आणून तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.सदरची कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण काळे,दत्ता घुगल,संजय राठोड,उमरबेग मिर्झा यांच्या पथकाने केली.

वडिलांची नोकरी गेल्याने टोकाचे पाऊल👇
 
पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता,तिने वडिलांची नोकरी गेल्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले.घरची आर्थिक स्थिती खराब झाली होती व पैसे कमविण्यासाठीच नेपाळला गेल्याचे तिने सांगितले.ती सीतामढी बसमध्ये बसली असता देवी पाठक या महिलेला ती दिसली.ती एकटी असल्याने तिची विचारपूस केली असता ती घरातून निघून आल्याची बाब समोर आली.ती भटकू नये किंवा तिचा कुणी गैरफायदा घेऊ नये,यासाठी पाठक या महिलेने तिला सोबत घरी नेले.महिलेने तिच्या घरी संपर्क करण्याअगोदरच पोलिसांनी तिचा शोध घेतला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!