Thursday, June 4, 2026
Homeलातूरझाडाखाली थांबले आठ जण; तितक्यातच कोसळली वीज.. - वीज कोसळून दोघांचा मृत्यू...

झाडाखाली थांबले आठ जण; तितक्यातच कोसळली वीज.. – वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर सहाजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
लातूर :- जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.अश्यातच आज,सोमवार २६ मे रोजी लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले.त्यातच शेतातील मान्सून पूर्व मशागतीची व इतर कामे आज सोमवारी दुपारच्या सुमारास आठ मजूर करीत असतांनाच अचानकपणे पावसाने हजेरी लावली.त्यामुळे आठही मजूर शिवारातील एका झाडाच्या आडोशाला गेले असता झाडावर वीज कोसळली.यात झाडाखाली थांबलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावात आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.यात
विक्रम कारले आणि रंजनबाई समुखराव यांचा  जागीच मृत्यू झाला.
अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावातील आठ मजूर आज शेतात मान्सून पूर्व मशागतीची कामे आणि शेंगा वेचण्यासाठी गेले होते.कामे करीत असतांनाच  पावसाला सुरुवात झाली.पावसापासून बचाव करण्यासाठी आठ शेतमजूर एका झाडाखाली थांबले. त्याचवेळी झाडावर वीज कोसळली.या दुर्घटनेत विक्रम कारले आणि रंजनबाई समुखराव या दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. इतर सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदपूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच अहमदपूरचे आमदार आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली.त्यांनी जखमी मजुरांची विचारपूस करून  सर्वांना तातडीने पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याचे आदेश दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!